शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

...हे धाडस वाखाणण्याजोगे ! 

By श्याम बागुल | Published: June 19, 2019 7:00 PM

नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्टÑवादीने लढविल्या व अपेक्षेप्रमाणे त्या गमावल्यादेखील. नाशिकच्या जागेवर सलग दुसऱ्यांदा राष्टÑवादीला पराभवाचे धनी व्हावे लागले हा नवीन विक्रम या निमित्ताने पक्षाच्या खात्यावर जमा झाला.

 श्याम बागुललोकसभा निवडणुकीत भाजपा-सेनेच्या विरोधात लढताना अक्षरश: पालापाचोळा झालेल्या कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसने या पराभवाच्या नैराश्येच्या गर्तेत अडकून न पडता लगोलग विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ही तयारी करताना दोन्ही पक्षांनी स्वतंत्र बैठका घेऊन तालुका, जिल्हाध्यक्षांकडून विधानसभानिहाय आढावा घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य मतदारसंघाची चाचपणीही सुरू केली आहे. दोन्ही पक्षांच्या बैठकांमध्ये एकमेकांची उणी-दुणी काढण्यात येऊन कोणी कोणत्या मतदारसंघात कसा दगाफटका केला याचे अनुभव कथन करण्याबरोबरच, सन्मानाने जागा वाटप झाल्यास आघाडी करावी अन्यथा (नसलेल्या) बळावर निवडणूक लढविण्यास तयार असल्याचा जो काही संदेश सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला आहे तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.

नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्टÑवादीने लढविल्या व अपेक्षेप्रमाणे त्या गमावल्यादेखील. नाशिकच्या जागेवर सलग दुसऱ्यांदा राष्टÑवादीला पराभवाचे धनी व्हावे लागले हा नवीन विक्रम या निमित्ताने पक्षाच्या खात्यावर जमा झाला. दिंडोरीच्या जागेबाबत पक्ष नाशिकपेक्षा अधिक खात्री बाळगून होता. बारामतीनंतर दिंडोरी मतदारसंघ पक्षासाठी सुरक्षित मानला जात असताना तेथेही पक्षाला जोरदार फटका बसला. अर्थातच लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची कारणमीमांसा पक्ष पातळीवर होऊन अख्ख्या देशातच भल्याभल्यांची धूळधाण उडालेली असताना समीर भुजबळ काय किंवा धनराज महाले काय दोहोंचा पराभव फार विशेष नसल्याची भावना पक्ष पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांनी बाळगली आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळे असेल असे सांगून कॉँगे्रस व राष्टÑवादी कॉँग्रेस अजूनही आशावादी असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होणे साहजिकच आहे. त्यामुळेच की काय राष्टÑवादीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर पक्षाच्या पदाधिका-यांनी अजूनही पक्षाला किती व कसे अनुकूल वातावरण आहे, याचे आभासी चित्र रंगवित, जिल्ह्यातील तेरा विधानसभेच्या जागांवर दावा ठोकला आहे. हा वादा ठोकताना जणू काही विरोधी पक्ष अस्तित्वातच नाही अशा आविर्भावात सामाजिक व राजकीय गणिते मांडून इच्छुकांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. मुळात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला त्या त्या विधानसभा मतदारसंघात मिळालेली आकडेवारी ताजी असून, त्यात नजीकच्या काळात राजकीय व सामाजिक बदल होण्याची सूतराम शक्यता नाही, या वास्तवाशी एकतर पदाधिकारी असहमत असावेत किंवा ते स्वत:च स्वत:ची फसवणूक करून घेत असावेत. असाच काहीसा प्रकार जिल्हा कॉँग्रेसच्या बैठकीत घडला आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान राष्ट्रवादीने विश्वासात घेतले नाही, असा सूर आळवणा-या पदाधिका-यांच्या मतदारसंघातच कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला पिछाडीची मते मिळाल्याचे सोयीस्कर विसरलेल्या पदाधिका-यांनी सन्मानाने आघाडी न झाल्यास स्वबळावर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच पंधरा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची भाषा केली आहे. मुळात गेल्या पाच वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक जागा उमेदवाराअभावी पक्षाला लढविता आलेल्या नाहीत, पक्षाच्या ताब्यातून सत्तेची सारी सूत्रे जनतेने कधीच हिसकावून घेतलेली असून, कार्यकर्तेही पक्ष कार्यालयाकडे फिरकेनासे झालेले आहेत. अशा परिस्थितीतही कॉँग्रेस पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असेल तर त्यांचे हे धाडसदेखील वाखाणण्याजोगे आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस