लासलगावी हत्यारांचा धाक दाखवत धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 16:18 IST2020-12-18T16:18:39+5:302020-12-18T16:18:55+5:30

पाच लाखांचे दागिने लंपास : चोरीच्या वाढत्या सत्रामुळे नागरिक दहशतीत

Brave theft in fear of Lasalgaon killers | लासलगावी हत्यारांचा धाक दाखवत धाडसी चोरी

लासलगावी हत्यारांचा धाक दाखवत धाडसी चोरी

ठळक मुद्देचोरट्यांनी प्रमोद यांच्या पत्नीला धारदार हत्यारांचा धाक दाखविला

लासलगाव : येथील गोविंदनगरमध्ये गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास तीन ते चार जणांच्या टोळक्याने सुरगाणा येथील शिक्षक पतसंस्थेत क्लार्क म्हणून कामाला असलेले प्रमोद गिरी गोसावी यांच्या घराचा कडीकोयंडा तोडत घरात प्रवेश करून पत्नीला आणि मुलीला धारदार हत्यारांचा धाक दाखवत अंदाजे पाच लाख रुपयांचे दहा ते अकरा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेने नागरिक हादरले आहेत. मध्यंतरी थांबलेल्या चोऱ्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील गोविंदनगर परिसरात राहत असलेले प्रमोद रतन गिरी गोसावी हे सुरगाणा येथील शिक्षक पंतसंस्थेत सेवेत असून, आठवड्यातून दोन वेळा ते आपल्या घरी येत असतात. घरात त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा राहत असल्याचा फायदा घेत तीन ते चार जणांच्या टोळक्याने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन वाजेदरम्यान घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी प्रमोद यांच्या पत्नीला धारदार हत्यारांचा धाक दाखविला असता घरात सोन्याचे दागिने नसून बँकेत ठेवल्याचे पत्नीने सांगितले. त्याच वेळी एका चोराने त्यांच्या दहा ते बारा वर्षाच्या मुलीला सोन्याचे दागिने कुठे आहे, न दिल्यास जीवे ठार मारून टाकू असा सज्जड दम भरल्यामुळे त्या चिमुकलीने घरातील सुमारे ११ तोळे सोन्याचे (पाच लाख रुपये किंमत) दागिने चोरांना काढून दिले. दागिने घेऊन चोरांनी पोबारा केला.

Web Title: Brave theft in fear of Lasalgaon killers