रेल्वेची पितळी घंटा भुसावळच्या रेल्वे संग्रहालयात रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:14 IST2019-12-10T00:13:58+5:302019-12-10T00:14:27+5:30
नाशिकरोड रेल्वेस्थानकात रेल्वेगाडी आगमन व निर्गमनाची सूचना देणारी पितळी घंटा रविवारीअखेर इतिहास जमा होऊन तिची रवानगी भुसावळच्या वस्तू संग्रहालयात करण्यात आली.

रेल्वेची पितळी घंटा भुसावळच्या रेल्वे संग्रहालयात रवाना
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकात रेल्वेगाडी आगमन व निर्गमनाची सूचना देणारी पितळी घंटा रविवारीअखेर इतिहास जमा होऊन तिची रवानगी भुसावळच्या वस्तू संग्रहालयात करण्यात आली.
रेल्वेस्थानकात गाडी येतांना व सुटताना प्रवाशांना सूचना देण्यासाठी पूर्वी घंटा वाजवली जात असे. गाडी मुंबईकडे (अप) जाणार असेल तर घंटानाद झाल्यावर शेवटी चारवेळा सावकाश घंटा वाजवली जात असे. गाडी भुसावळच्या दिशेने (डाउन) जाणार असेल तर घंटानादानंतर तीन वेळा घंटा सावकाश वाजवली जात होती.
त्यामुळे प्रवाशांना गाडी अपची आहे की डाउनची याचा अंदाज येत असे. रेल्वेस्थानकावर स्पीकरवरून रेल्वे येण्या-जाण्याबाबत अनाउन्सिंग होत असल्याने सदरची घंटा काढल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
रेल्वेस्थानक प्रबंधक कार्यालय पत्ता कोठे आहे असे कोणी विचारले तर त्यासाठी घंटा ही महत्त्वाची खूण होती. नाशिकरोड स्थानकात स्टेशनमास्तरच्या कार्यालयाजवळ लोखंडी एन्गलच्या स्टॅन्डला पितळी घंटा लावण्यात आली होती. ती पितळी घंटा काढण्यात येऊन तिची भुसावळच्या वस्तू संग्रहालयात पाठविण्यात आली.