शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

ब्राम्हणवाडेत थकबाकीदारांचा पाणीपुरवठा होणार खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 5:18 PM

प्रशासनाचा इशारा : ग्रामस्थ पाणीपट्टी भरत नसल्याने निर्णय

ठळक मुद्देग्रामपंचायत प्रशासनाने थकबाकीदार ग्रामस्थांनी महिनाभरात थकबाकी भरली नाही तर संबधीतांचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

नायगाव - सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील पाणीपट्टी थकबाकीदारांचा पाणीपुरवठा महिनाभरानंतर खंडीत होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे.

ग्रामस्थांना वारंवार आवाहन करुनही थकबाकीचा भरणा केला जात नसल्याने ग्रामपालिकेने अखेर हा निर्णय घेतला आहे.  ग्रामपंचायतीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीची थकबाकी मोठया प्रमाणात वाढली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना व परिसरातील कंपन्यांना अनेकवेळा नोटीस देऊन घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यास सांगितले आहे. असे असतांनाही ग्रामस्थ घरपट्टीसह पाणीपट्टीही भरत नाहीत. अनेक ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षापासुन पाणीपट्टी थकवली आहे. तर काही लोक राजकीय द्वेषापोटी जाणूनबुजून सर्वसामान्य ग्रामस्थांना कर भरण्यास मनाई करत असल्यामुळे ग्रामपंचायतीची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने थकबाकीदार ग्रामस्थांनी महिनाभरात थकबाकी भरली नाही तर संबधीतांचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मोठया प्रमाणात घरपट्टी व पाणीपट्टी थकल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला गावात लोकहितांची कामे करता येत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.मूलभूत सुविधा पुरविण्यास अडचणींगेल्या अनेक दिवसांपासुन अनेक ग्रामस्थ पाणीपट्टी व घरपट्टी भरत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला गावातील मूलभूत सुविधा पुरविण्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. थकबाकीदार ग्रामस्थांनी पाणीपट्टी व घरपट्टी भरून सहकार्य करावे.-- मंगला घुगे, सरपंच,ब्राम्हणवाडे

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी