ब्रेक फेल झाल्याने पिकअप १०० फूट खोल दरीमध्ये कोसळली

By प्रसाद गो.जोशी | Published: January 5, 2024 03:34 PM2024-01-05T15:34:29+5:302024-01-05T15:37:00+5:30

चालकाने उडी मारल्याने तो बचावला.

brake failed and the pickup plunged into a 100 feet deep ravine | ब्रेक फेल झाल्याने पिकअप १०० फूट खोल दरीमध्ये कोसळली

ब्रेक फेल झाल्याने पिकअप १०० फूट खोल दरीमध्ये कोसळली

लोकमत न्यूज नेटवर्क, वांगणसुळे (दौलत चौधरी) : सुरगाणा तालुक्यातील वांगणसुळे घाटात पिकअपचे ब्रेक फेल झाल्याने हे वाहन १०० फूट खोल दरीमध्ये काेसळले. मात्र चालकाने उडी मारल्याने तो बचावला.

वापी येथून किराणा घेऊन जाणारी पिकअप (क्र्य जी जे २१ वाय ६३४१) ही बाऱ्हे येथे किराणा पोहोचवून परतत असताना वांगणसुळे घाटात सकाळी आठ वाजेच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने पिकअप १०० फूट खोल दरीत कोसळली. यामुळे गाडीचे अतोनात नुकसान झाले आहे. ब्रेक फेल होताच चालकाने गाडीतून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला.

Web Title: brake failed and the pickup plunged into a 100 feet deep ravine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात