Brahmagiri circulation of millions of devotees! | लाखो भाविकांची ब्रह्मगिरी परिक्रमा !
लाखो भाविकांची ब्रह्मगिरी परिक्रमा !

त्र्यंबकेश्वर : पावसाची रिपरिप अन् मुखी ‘बम बम भोले’ ओम नम: शिवायचा जयघोष करत तिसऱ्या श्रावणी सोमवारी लाखो भाविकांनी ब्रह्मगिरी परिक्रमा करीत पुण्य पदरी पाडून घेतले. राज्याच्या विविध भागातील प्रदक्षिणार्थीं फेरीत सहभागी झाले होते. लाखो भाविकांनी ब्रम्हगिरी परिक्र मेस (फेरी) रविवारी रात्रीपासुनच सुरु वात केली असल्याने संपुर्ण त्र्यंबक नगरी गजबजून गेली होती. वरूणराजा आगमन अन् डोंगरावरु न वाहणारे धबधबे, सर्वत्र पसरेलली हिरवाई तर काही ठिकाणी डोंगर धुक्याने वेढलेला अशा वातावरणात परिक्र मा पार पडली. रविवारी रात्री ८.३० पासुनच बम बम भोलेचा जयघोष सुरु होउन घोळक्या घोळक्याने फेरीकरिता भाविक जात होते. कुशावर्त तिर्थ परिसर तसेच मुख्य मंदीरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्र्यंबकेश्वर परिसरात सिंहस्थ कुंभमेळा धर्तीवर भाविकांच्या सोयीसाठी जव्हार फाटा, बुवाचीवाडी (अंबोली), पहिणे, तळवाडे येथे चार वाहनतळे उभारण्यात आले होते. जेणेकरु न गावात वाहनांची गर्दी होउ नये. वाहतुकीची कोंडी होउ नये म्हणुन पोलीस ही खबरदारी घेत होते. त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदे तर्फे गावात ठिकठिकाणी बॅरीकेड लावून रस्ते बंद करण्यात आले होते. फक्त तेलीगल्लीचा रस्ता खुला ठेवण्यात आला होता. म्हणजे गावाबाहेरील जव्हार फाट्यावर भाविक उतरल की, तेथुन जव्हार फाटा नं. २ ने पायपायी त्र्यंबक महाविद्यालय रोडने पोलीस स्टेशन हायस्कूल त्र्यंबक नगरपरिषद आदिवासी वसतीगृह मार्गे निवृत्तीनाथ रोडने तेलीगल्ली मार्गे कुशावर्त येथे जाऊन स्नान करु न फेरीकरिता भाविक जात होते. तर काही भाविक सरळ त्र्यंबकेश्वर मंदीर रस्त्याने कुशावर्तावर जाउन फेरीकरिता जात होते. रविवारी गावात जी वाहने आली ती गावातच राहिली. तर सोमवारी गावात खाजगी वाहनांसाठी प्रवेश बंद करु न खंबाळे येथे टेंपररी वाहन तळावर वाहने अडविण्यात येत होती. तेथुन एसटी बसने गावात (जव्हार फाटा बस स्थानक नं.१) वर उतरु न गावात येता येत होते.

Web Title: Brahmagiri circulation of millions of devotees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.