शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

क्लासमधील बाकावर बसण्याचा वाद जीवावर बेतला; बेदम मारहाणीत १० वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 16:33 IST

नाशकात क्षुल्लक कारणावरुन झालेल्या मारहाणीत एका १० विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Nashik Crime: सातपूरमध्ये यशराज तुकाराम गांगुर्डे या दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाचा खासगी क्लासजवळ शनिवारी सायंकाळी रस्त्यात कोसळून मृत्यू झाला होता. विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत चर्चाना पेव फुटले होते. मात्र आता यशराजच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्लासमध्ये बाकड्यावर बसण्याचा किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांना दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

अशोकनगर येथील पवार संकुलातील गांगुर्डे कुटुंबीयांचा मुलगा यशराज हा मॉर्डन विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. शनिवारी तो क्लासला येण्यासाठी घरातून बाहेर पडला. साडेसहा वाजेच्या दरम्यान तो क्लासजवळ असलेल्या उद्यानाजवळ रस्त्यात कोसळला. ही बाब काही विद्यार्थ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी क्लास शिक्षक व संचालकांना सांगितली. संचालक म्हस्के बंधूंनी यशराज यास जवळच्या दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी तेथून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले असता त्यांनी त्यास रुग्णालयात संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

यशराज याच्या मृत्यूबाबत विविध चर्चाना पेव फुटले होते. त्यामुळे शनिवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेमागील गूढ कायम होते. यशराजला कुठलाही आजार नव्हता. त्याचे कोणासोबत भांडण झाले नसल्याचे त्याच्या मोठ्या भावाने सांगितले. मात्र पोलीस तपासादरम्यान, खाजगी क्लासमध्ये बाकड्यावर बसण्याहून झालेल्या वादात शाळकरी मुलाची हत्या करण्यात आल्याचे समोर आलं आहे. यशराजचे त्याच्या क्लासमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसोबत बाकावर बसण्याहून बुधवारी वाद झाला होता. तेव्हापासून दोन्ही मुले त्याला सारखी डिवचत होती. या वादातून यशराजला शनिवारी क्लासच्या आवारात क्लासमधील दोन मुलांनी मारहाण केली. याच मारहाणीत यशराजचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, कोरोनाकाळात यशराजच्या वडिलांचे निधन झाले होते. या धक्क्यातून गांगुर्डे कुटुंबीयांनी स्वतःला सावरले होते. त्याचा मोठा भाऊ पिठाची गिरणी चालवतो. यशराज अभ्यासातदेखील हुशार होता, असे शिक्षकांसह कुटुंबीयांनी सांगितले. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस