बोरटेंभे शाळेचे बीटस्तरावर वर्चस्व
By Admin | Updated: January 23, 2016 23:07 IST2016-01-23T23:05:41+5:302016-01-23T23:07:20+5:30
निकाल : जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा

बोरटेंभे शाळेचे बीटस्तरावर वर्चस्व
इगतपुरी : स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच प्रयत्नशील राहावे आपली गुणवत्ता सिद्ध करून भविष्य व आपापले करिअर घडवावे तसेच प्रत्येक क्षेत्रात आपल्याला आलेल्या संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन पंचायत समिती इगतपुरीचे उपसभापती पाडुरंग वारूंगसे यांनी केले.
बोरटेभें (ता. इगतपुरी) येथील प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा अंतर्गत तालुक्यातील इगतपुरी केंद्र नंबर दोनच्या केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धांच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. इगतपुरी दोन केंद्रातील आठ शाळांमधील सुमारे ४०० ते ४५० खेळाडू व स्पर्धकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. केंद्रीय स्पर्धेत बोरटेंभे शाळेने आपले वर्चस्व कायम राखले आहेत. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संगीता आडोळे, देवीदास आडोळे, रवींद्र आडोळे, संतोष आडोळे, गुरु नाथ आडोळे, शिवाजी आरशेंडे, भाऊमामा आरशेंडे, केंद्रप्रमुख हिराबाई खतेले, विलास बत्तीसे, मुख्याध्यापक दत्तात्रय वाणी, राज्य स्वाभिमानी आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष काशीनाथ भोईर, ज्ञानेश्वर भोईर, माणिक भालेराव, विजय पगारे, प्राजक्ता महाजन, गोरख तारडे, लता जाधव, संतोष श्रीवंत, अतुल अहिरे, ज्वाला भोसले व केंद्रातील सर्व सहभागी स्पर्धक उपस्थित होते. स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व
ट्रॉफीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पगारे यांनी, तर अतुल आहिरे यांनी आभार व्यक्त केले. (वार्ताहर)