दोघे दुचाकी चोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 23:52 IST2018-09-02T23:52:29+5:302018-09-02T23:52:33+5:30

सटाणा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साक्री तालुक्यात छापे टाकून दोन दुचाकी चोरांना जेरबंद केले. त्यांच्याकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या. पुढील तपासासाठी दोन्ही चोरट्यांना पाच दुचाकींसह सटाणा पोलिसांच्या ताब्यात दिले.

 Both the two-wheeled thief jerbund | दोघे दुचाकी चोर जेरबंद

दोघे दुचाकी चोर जेरबंद

ठळक मुद्देदोन्ही आरोपींच्या घरामध्ये चोरीच्या पाच दुचाकी मिळून आल्या

सटाणा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साक्री तालुक्यात छापे टाकून दोन दुचाकी चोरांना जेरबंद केले. त्यांच्याकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या. पुढील तपासासाठी दोन्ही चोरट्यांना पाच दुचाकींसह सटाणा पोलिसांच्या ताब्यात दिले.
दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार साक्री तालुक्यातील दोन व्यक्ती कसमादे परिसरातून दुचाकींची चोरी करून त्या विकण्याच्या प्रयत्नात असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार आज पहाटे पोलिसांनी मगन बापू देसाई (४५) रा. मोकाडपाडा ता. साक्री) व सोमनाथ भगवान कापडणीस (३५ रा. इंदिरानगर, पिंपळनेर) यांच्या घरात छापा मारला असता दोन्ही आरोपींच्या घरामध्ये चोरीच्या पाच दुचाकी मिळून आल्या आहेत.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांनी चोरलेल्या काळ्या रंगाची डिस्कव्हर (एमएच ३९ एजी ६४१७), काळ्या रंगाची स्प्लेंडर (एमएच १५ एएल ३४२०), काळ्या रंगाची सीडी डिलक्स (एमएच ०४ डीपी ७४३०), काळया रंगाची स्प्लेंडर (नंबर नाही, चेसीज नंबर खोडलेली, इंजिन नंबर व लाल सिल्व्हर पट्टा असलेली हिरो एचएफ डिलक्स अशा १ लाख ३३ हजार रुपयांच्या पाच चोरीच्या दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत.

Web Title:  Both the two-wheeled thief jerbund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.