गुन्हेगार लोखंडे खून प्रकरणी दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:16 IST2018-09-14T00:16:27+5:302018-09-14T00:16:49+5:30
फुलेनगर पाण्याच्या पाटालगत राहणाऱ्या प्रवीण अरुण लोखंडे ऊर्फ टकल्या या सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना गुरुवारी ताब्यात घेतले आहे.

गुन्हेगार लोखंडे खून प्रकरणी दोघे ताब्यात
पंचवटी : फुलेनगर पाण्याच्या पाटालगत राहणाऱ्या प्रवीण अरुण लोखंडे ऊर्फ टकल्या या सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना गुरुवारी ताब्यात घेतले आहे. लोखंडे याचा मंगळवारी रात्री पाटाजवळील वसाहतीत धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून करण्यात आला होता त्यानंतर संशयित मारेकरी पसार झालेले होते.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तीन ते चार संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता गुरुवारी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना संशयित आरोपी पेठरोड परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, कैलास वाघ, हवालदार बाळा ठाकरे, सुरेश नरवडे, अरुण गायकवाड, संदीप शेळके, महेश साळुंके, संतोष काकड, बाळासाहेब मुर्तडक परिसरात पोलिस पथक पाठवून पोलिसांनी मखमलाबाद एरीकेशन कॉलनीतील रामशृष्टी सोसायटीत राहणाºया सोनू बाबुराव धात्रक तसेच जुईनगर पंचम सोसायटी येथे राहणाºया नितीन रमेश खलसे या दोघांना ताब्यात घेतले. दोघांनी संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी अन्य संशयितांच्या मदतीने सराईत गुन्हेगार लोखंडे याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान या प्रकरणातील अजून काही संशयित आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सराईत गुन्हेगार लोखंडे यांचा खून पूर्ववैमनस्यातून की अन्य काही कारणावरून झाला याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.