मनमाडला थंडीमुळे दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 01:33 IST2019-02-11T01:32:40+5:302019-02-11T01:33:56+5:30

मनमाड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन बेवारस इसमांचे मृतदेह रविवारी आढळून आले आहे. सध्या परिसरात कडाक्याची थंडी पडली असून, या दोघांचा थंडीमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Both of them died due to cold in Manmad | मनमाडला थंडीमुळे दोघांचा मृत्यू

मनमाडला थंडीमुळे दोघांचा मृत्यू

मनमाड : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन बेवारस इसमांचे मृतदेह रविवारी आढळून आले आहे. सध्या परिसरात कडाक्याची थंडी पडली असून, या दोघांचा थंडीमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या शाळेजवळ एकाचा तर उपजिल्हा रुग्णालय मार्गावर दुसऱ्या बेवारस नागरिकाचा मृतदेह आढळून आला. दोन्ही मृतदेह बेवारस असल्यामुळे मिलिंद या सामाजिक संस्थेचे प्रमुख पिंटू कटारे व त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी कायदेशीर बाबी पूर्ण करून या दोघा बेवारसावर अंत्यसंस्कार केले. जम्मू काश्मीर,उत्तराखंड भागात होत असलेली हिमवृष्टी व दिल्लीत झालेला पाऊस आदी कारणामुळे काही दिवसापासून ओसरलेल्या थंडीचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडीचा सर्वात जास्त फटका झोपडपट्टीसह रेल्वे स्थानक व बस स्थानकावरील बेवारसांना बसत आहे.

Web Title: Both of them died due to cold in Manmad