अपघातात दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:15 IST2020-05-17T22:47:46+5:302020-05-18T00:15:02+5:30
सटाणा : दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. हा अपघात रावळगाव फाट्यानजीक शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला.

अपघातात दोघे ठार
सटाणा : दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. हा अपघात रावळगाव फाट्यानजीक शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला.
रावळगाव फाट्यानजीक भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात ब्राह्मणगाव येथील अतुल रमेश सोनवणे (२३) याला डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर केएल मार्केटचे संचालक अंबादास सोनवणे यांचा मुलगा ललित (२७) याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यास सटाणा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेचे वृत्त समजताच ब्राह्मणगावसह सटाणा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सटाणा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस नाईक नवनाथ पवार, अजय महाजन करीत आहेत.