बस-कार अपघातात दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 20:49 IST2021-08-07T20:48:55+5:302021-08-07T20:49:40+5:30
राजापूर - येवला तालुक्यातील राजापूर येथे येवला-नांदगाव रस्त्यावर वाघ वस्तीजवळ बस व अल्टो कार यांच्यात समोरासमोर धडक झाली आहे.

बस-कार अपघातात दोघे जखमी
राजापूर - येवला तालुक्यातील राजापूर येथे येवला-नांदगाव रस्त्यावर वाघ वस्तीजवळ बस व अल्टो कार यांच्यात समोरासमोर धडक झाली आहे.
नांदगाव आगाराची परळी-बीड ही येवल्याकडुन नांदगावकडे जाणारी एसटी बस (एमएच १४ बीटी ४१७५) जात असताना नांदगावकडून येणारी अल्टो कार (एमएच १५ ईबी ९८०७) यांच्यात समोरासमोर धडक झाली. बस चालक दशरथ शेवाळे यांनी प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला नालीत गेली व बसमध्ये तीस ते चाळीस प्रवासी होते.
त्यामुळे बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
यात अल्टोमधील राजेंद्र घायाळ (नैताळे ता. निफाड) व सतीश (लाला )जमधडे (बल्हेगाव, ता. येवला) एसटी आगारात नोकरीला असलेले कर्मचारी जखमी झाले आहेत. अल्टोमधील हे दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी येवला येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळी सहायक पोलीस उपनिरीक्षक सुराशे यांनी पंचनामा केला आहे. अधिक चौकशी केली जात आहे.
(०७ राजापूर, १)