मालेगावी दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 19:21 IST2018-11-29T19:21:35+5:302018-11-29T19:21:51+5:30
मालेगाव : जीवे ठार मारण्याची धमकी देवून एका कापड व्यावसायिकाकडे दहा लाखाची खंडणी मागणाºया चौघांना गुरूवारी अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगावी दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक
मालेगाव : जीवे ठार मारण्याची धमकी देवून एका कापड व्यावसायिकाकडे दहा लाखाची खंडणी मागणाºया चौघांना गुरूवारी अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रौनकाबाद येथे राहणारे कापड व्यावसायिक शहेजाद शेख महेमुद (३८) हे बुधवारी दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास फतेह मैदान येथून जात असताना आरोपी मोहंमद जाफर रईस अहमद (३०) व त्याच्या इतर तीन साथीदारांनी कापड व्यावसायिक शहेजाद शेख यांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडे दहा लाखांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहेजाद शेख यांनी आझादनगर पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी चौघाही संशयित आरोपीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आसीफ शेख करीत आहेत.