संकटकाळातही बॉश कंपनीत वेतनवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 23:05 IST2020-05-03T23:03:41+5:302020-05-03T23:05:57+5:30
सातपूर : कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असून, कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले असताना सातपूरच्या बॉश कंपनी व्यवस्थापन आणि अंतर्गत कामगार संघटना यांच्यात वेतनवाढीचा करार झाल्याची सुखद घटना रविवारी घडली. कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे, तर २३० हंगामी कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक करार झाल्याची माहिती बॉश युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वेतनकराराप्रसंगी कंपनीचे उपाध्यक्ष अनंतरामन. समवेत मुकुंद भट, श्रीकांत चव्हाण, युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव, श्रीकृष्ण कुलकर्णी, भाऊसाहेब बोराडे, नितीन बिडवाई, हरिभाऊ नाठे, विनायक येवला आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असून, कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले असताना सातपूरच्या बॉश कंपनी व्यवस्थापन आणि अंतर्गत कामगार संघटना यांच्यात वेतनवाढीचा करार झाल्याची सुखद घटना रविवारी घडली. कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे, तर २३० हंगामी कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक करार झाल्याची माहिती बॉश युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या ४० महिन्यांपासून हा करार प्रलंबित होता. दीड महिन्यांपूर्वी नवीन युनियन पदाधिकाऱ्यांनी कराराची बोलणी पुढे चालू ठेवत रविवारी (दि.३) उभयपक्षांनी अंतिम करारावर स्वाक्षºया केल्या. या करारानुसार साडेसात हजार रुपये वेतनवाढ आणि सात टक्के उत्पादन वाढ दिल्यानंतर अडीच हजार (व्हेरिएबल बास्केट) असे दहा हजार रुपये दरमहा कामगारांना मिळणार आहेत. त्यासोबतच सीपीआय डी लिंकिंगचे तीन हजार रुपये वेगळे मिळणार आहेत. दि.१ जानेवरी २०१७ रोजी हजेरी पटावर असलेल्या सर्व कायम कामगारांना ही वेतनवाढ मिळणार आहे. दि.३ मेपासून १३० हंगामी कामगार कायम होणार असून, पुढील सहा महिन्यांत उर्वरित शंभर हंगामी कामगार कायम होतील. या करारावर कंपनीचे उपाध्यक्ष अनंतरामन, उपाध्यक्ष मुकुंद भट, मनुष्यबळ महाव्यवस्थापक श्रीकांत चव्हाण, तसेच सतीश कुमार, जतीन सुळे, तमाल सेन, शरद गिते यांच्यासह युनियनकडून अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी, उपाध्यक्ष भाऊसाहेब बोराडे, नितीन बिडवाई, सहचिटणीस हरिभाऊ नाठे, विनायक येवला, खजिनदार नंदू अहिरेआदिंनी स्वाक्षºया केल्या.व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा करून केवळ पैसे न पाहता भविष्यकाळाचा विचार केला. नाशिकच्या कारखान्यात नवीन गुंतवणूक करण्याचे आश्वासन वरिष्ठ व्यवस्थापनाने दिले आहे. कामगारांना ४० महिन्यांचा फरक मिळणार आहे. करारामुळे कामगारांमध्ये विश्वासाचे आणि दिलासादायक वातावरण निर्माण होणार आहे.
-अरुण भालेराव,
अध्यक्ष, बॉश कामगार संघटना