शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बागलाणमध्ये बोरसे यांनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 00:30 IST

बागलाण मतदारसंघात भाजपच्या दिलीप मंगळू बोरसे यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा 33,694 मतांनी दणदणीत पराभव केला. बोरसे यांनी तालुक्यात ल. तो. पवार यांच्यानंतर प्रथमच दोनवेळा आमदारकी मिळविण्याचा विक्रम केला असून बागलाणच्या राजकारणाने आता पूर्णपणे कूस बदलली आहे.

सटाणा : बागलाण मतदारसंघात भाजपच्या दिलीप मंगळू बोरसे यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा 33,694 मतांनी दणदणीत पराभव केला. बोरसे यांनी तालुक्यात ल. तो. पवार यांच्यानंतर प्रथमच दोनवेळा आमदारकी मिळविण्याचा विक्रम केला असून बागलाणच्या राजकारणाने आता पूर्णपणे कूस बदलली आहे.बागलाण विधानसभा मतदारसंघासाठी गुरु वारी सकाळी आठ वाजता येथील नवीन प्रशासकीय इमारतीत मतमोजणीस प्रारंभ झाला. याठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच प्रशासकीय इमारतीच्या परिसरात वाहनांना मज्जाव करण्यात आला होता. मतमोजणी कक्षात एकूण चौदा टेबलची मांडणी करण्यात आली होती. प्रारंभी टपाली मतांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीच्या पहिल्या फेरीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीत बोरसे यांना 5449 तर चव्हाण यांना 3909 मते मिळाली. यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने एकेक फेरीची मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासून अखेरच्या एकवीसाव्या फेरीपर्यंत भाजपाचे बोरसे यांची आघाडी टिकून राहिली. फेरीनिहाय आकडेवारीची माहिती ध्वनिक्षेपकावरून जाहीर होताच समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात येत होती. एकूण एकवीस फेऱ्या झाल्यानंतर टपाली मतमोजणी करण्यात आली. शेवटच्या फेरीअखेर बोरसे यांना 94,683 तर चव्हाण यांना 60,989 मते मिळाली. त्यामुळे भाजपचे बोरसे हे 33,694 मतांनी विजयी झाल्याची घोषणा करून त्यांना निवडून आल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विजयानंतर भाजप समर्थक व बोरसे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.विजयाची तीन कारणे...1जनसामान्यांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचा स्वभाव, कमालीची साधी राहणी तसेच कार्यकर्त्याच्या भूमिकेतून लढणारा व सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा नेता.2बागलाण तालुक्यातील पाणी, रस्ते, विकासकामे तसेच शेतीप्रश्नांची उत्तम जाण.3राजकीय हेवेदावे न ठेवता स्वच्छ राजकारण, विकासासाठी तसेच जनतेच्या न्यायहक्कांसाठी झोकून देऊन काम करणारा व स्वच्छ प्रतिमा ही बलस्थाने.चव्हाणांच्या पराभवाचे कारण...तालुक्यातील काही कामे मार्गी लावण्याचा चांगला प्रयत्न केला असला तरी ग्रामीण जनतेशी संपर्काचा काहीसा अभाव, पुनंद पाणीपुरवठा योजनेबाबत राजकारण केल्याचा आरोप, सटाण्याचा बायपासचा रखडलेला प्रश्न, सिंचनाचे प्रश्नांबद्दल नाराजी.पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते१ दीपिका चव्हाण राष्ट्रवादी 60989२ अंजना मोरे बसपा 981३ गुलाब गावित अपक्ष 1547४ राकेश घोडे अपक्ष 5196५ पंडित बोरसे अपक्ष 1204

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019satara-acसाताराBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक