विनाभूल महिलेच्या घशातून काढला हाडाचा तुकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:20 IST2018-08-23T00:07:29+5:302018-08-23T00:20:06+5:30

Bone removed from the throat of a nasty woman | विनाभूल महिलेच्या घशातून काढला हाडाचा तुकडा

विनाभूल महिलेच्या घशातून काढला हाडाचा तुकडा

नाशिक : खेकडे खात असताना घशात अडकलेले हाड महिलेस भूल न देता दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया करून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी बाहेर काढले आहे़ गिरणारे येथील सुशीला भगवान भोेये ही महिला खेकडे खात असताना तिच्या घशात खेकड्याचे हाड अडकले़ यामुळे त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता़ त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते़ या महिलेची डॉ़ संजय गांगुर्डे व डॉ़ शेळके यांनी तपासणी करून भूल न देता दुर्बिनीद्वारे घशात अडकलेले हाड काढण्याचा निर्णय घेतला़ यानंतर डॉक्टरांनी अवघ्या काही मिनिटांत दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया करून भोेये यांच्या घशात अडकलेले हाड बाहेर काढले़ या घटनेमुळे महिलेस जीवदान मिळाले.

Web Title: Bone removed from the throat of a nasty woman