बोहरा बांधवांकडून धर्मगुरूंचा वाढदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 01:30 IST2019-12-18T01:30:10+5:302019-12-18T01:30:37+5:30
शहरातील दाऊदी बोहरा बांधवांनी समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांचा १०९वा तसेच डॉ. सय्यदना मुफ्फद्दल सैफुद्दीन ७६वा वाढदिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

शहरातून काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये सहभागी झालेले बोहरा समाजबांधव.
नाशिक : शहरातील दाऊदी बोहरा बांधवांनी समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांचा १०९वा तसेच डॉ. सय्यदना मुफ्फद्दल सैफुद्दीन ७६वा वाढदिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
द्वारका येथील अंजुमन-ए-हकिमी ट्रस्टच्या वतीने कुतुबी मशिदीत दोन्ही धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच मशिदीपासून द्वारका परिसरातून जुलूस काढण्यात आला. जुलूसची सांगता झाल्यानंतर कुतुबी मशिदीत डॉ. सय्यदना मुफ्फद्दल यांचे प्रवचनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. दरम्यान, सुरत येथील सोहळ्यासाठी नाशिक शहरातील समाजाची एमएसबी विद्यालयाच्या बॅन्ड पथकाने सहभाग नोंदविला. तसेच शहराचे अमील मुस्ताली भाईसाहब व ट्रस्टचे विविध पदाधिकाऱ्यांनीही सुरत येथील सोहळ्याला हजेरी लावली.