विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 18:14 IST2021-04-18T18:13:55+5:302021-04-18T18:14:35+5:30
कसबे सुकेणे : येथील शिवारात एका शेतातील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळून आला असून मृतदेहाची ओळख पटली असल्याची माहिती ओझर पोलिसांनी दिली.

विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह
कसबे सुकेणे : येथील शिवारात एका शेतातील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळून आला असून मृतदेहाची ओळख पटली असल्याची माहिती ओझर पोलिसांनी दिली.
कसबे सुकेणे येथील संतोष काळे यांच्या शेतीतील विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती संतोष काळे यांनी शेतात काम करीत असलेल्या छबू जगन्नाथ काळे यांना दिली. काळे यांनी ही माहिती पोलिसांना कळविली. कसबे सुकेणे व ओझर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला, सदरचा मृतदेह हा कसबे सुकेणे येथील गणेश गोपाळ काळे (२३) याचा असल्याची ओळख पटली असून ओझर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास ओझर पोलीस करीत आहेत.