शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

शालिमारला महिलेचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:35 IST

शहरातील गजबजलेल्या शालिमार चौकातील श्रमिक सेना कार्यालयाच्या पाठीमागे अज्ञात महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (दि़२८) घडली़ या महिलेची ओळख पटलेली नसून शवविच्छेदन अहवालातही अकस्मात मृत्यूचे कारण वैद्यकीय सूत्रांनी दिले आहे़ दरम्यान, या महिलेचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, त्याच्या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे़

नाशिक : शहरातील गजबजलेल्या शालिमार चौकातील श्रमिक सेना कार्यालयाच्या पाठीमागे अज्ञात महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (दि़२८) घडली़ या महिलेची ओळख पटलेली नसून शवविच्छेदन अहवालातही अकस्मात मृत्यूचे कारण वैद्यकीय सूत्रांनी दिले आहे़ दरम्यान, या महिलेचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, त्याच्या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे़  भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी १२ वाजेच्या सुमारास शालिमार परिसरात दुर्गंधी पसरली होती़ याबाबत नागरिकांनी तपासणी केल्यानंतर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय व श्रमिक सेना कार्यालयाच्या भिंतीजवळ एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला़ नागरिकांनी ही घटना भद्रकाली पोलिसांना सांगताच पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव हे कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले होते़ दोन-तीन दिवसांपूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला असून, तिचा मृतदेह कु जण्यास सुरुवात झाली होती़मयत महिला ही अंदाजे ३० ते ४० वयोगटांतील असून, तिने अंगात पंजाबी ड्रेस घातलेला आहे़ या महिलेची ओळख पटलेली नसून प्रथम तिच्यावर अत्याचार व नंतर खून करण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात होता़ जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालात या महिलेच्या अंगावर मारहाणीच्या वा संशयास्पद खुणा आढळल्या नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांनी दिली़  दरम्यान, महिलेच्या मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcrimeगुन्हे