साकूरफाटा येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 23:04 IST2021-12-02T23:04:23+5:302021-12-02T23:04:23+5:30
गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील साकूरफाटा येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे.

साकूरफाटा येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील साकूरफाटा येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे.
सकाळी नऊ वाजेदरम्यान साकूरफाटा येथील साकूर गावाच्या हद्दीत असलेल्या दत्तकृपा भेळ दुकानाच्या बाजूला एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अंगावर बनियन, जर्किन, आणि जीन्स पॅन्ट, असे कपडे असून वय अंदाजे ४० ते ५० दरम्यान असावे. याबाबत माहिती मिळताच साकूर येथील पोलीस पाटील शिवाजी सहाणे यांनी तात्काळ संबंधित माहिती वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला दूरध्वनीवरून दिली.
घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे धारणकर, कांबळे हे घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा करून या इसमाचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.