शालीमार हॉटेलमागे आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 20:52 IST2021-09-24T20:52:28+5:302021-09-24T20:52:28+5:30
मालेगाव : शहरातील गॅरेज लाईनला शालीमार हॉटेलमागे असलेल्या न्यू अमर ॲटो गॅरेजमागे गुरुवारी एका वृद्धाचा मृतदेह मिळून आला.

शालीमार हॉटेलमागे आढळला मृतदेह
ठळक मुद्देपोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
मालेगाव : शहरातील गॅरेज लाईनला शालीमार हॉटेलमागे असलेल्या न्यू अमर ॲटो गॅरेजमागे गुरुवारी एका वृद्धाचा मृतदेह मिळून आला.
गॅरेज मालक फैजलभाई, रेहान आणि साजिदभाई यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी सामाजिक कार्यकर्ते शफीक शेख यांना माहिती दिली. शेख यांनी किल्ला पोलिसांत माहिती दिली. हवालदाराने पंचनामा केला. सामान्य रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आला. इकबाल अन्सारी म्हणून त्यांची ओळख पटली असून, गॅरेजमध्ये येणाऱ्या लोकांचा डबा खाऊन ते गुजराण करीत होते. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.