पाच दिवसांनंतर सापडला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:16 IST2017-12-19T00:11:37+5:302017-12-19T00:16:49+5:30
लोहोणेर : येथील शेतकरी हरी दगा शेवाळे यांच्या मालकीच्या विहिरीत धपाड पडून दबल्या गेलेल्या मुकेश सैनी (२२) या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात पाच दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सोमवारी सायंकाळी आठ वाजता लोहोणेर येथील स्थानिक युवकांना यश आले. अखेर पाच दिवसांपासून चालू असलेले शोधकार्य स्थानिक नागरिकांच्या मदतीने आज संपुष्टात आले.

लोहोणेर येथील हरी दगा शेवाळे यांच्या शेतातील विहिरीत दि. १३ रोजी सीमेंट रिंग टाकण्याचे काम चालू असताना राजस्थान येथील मजूर मुकेश गोपाळ सैनी हा विहिरीचे धपाड कोसळून विहिरीत दबला गेला. पाच दिवसांपासून विहिरीवर १४ विद्युतपंपांद्वारे पाण्याचा उपसा केला जात होता. कालपासून पुणे येथील एन.डी.आर.एफ.च्या १४ जणांच्या टीमने दिवसभर सदर युवकाचा शोध घेतला. विहिरीच्या बाजूने जेसीबीच्या सहाय्याने १५ फुटाची चारी खोदत तयार केली. आॅक्सिजनची नळकांडी घेत पाण्यात अर्धा अर्धा तास शोध घेऊनही या पथकाला यश मिळाले नाही. विहिरीत गाळाचे प्रमाणही जास्त असल्याने शोध घेण्यास मर्यादा पडत होत्या. परंतु सोमवारी सायंकाळी सात वाजता लोहोणेर येथील सोपान सोनवणे, रमेश अहिरे, हरी सोनवणे, अनिल पवार या स्थानिक तरु णांनी विहिरीत उतरून गाळातून सदर मृतदेह बाहेर काढला. यासाठी गेल्या पाच दिवसांपासून वीज मंडळाने सलग वीजपुरवठा कायम ठेवत व येथील शेतकºयांनी कांदा लागवड चालू असताना आपले विद्युत पंप उपलब्ध करून दिले.
याशिवाय आज दिवसभर तहसीलदार कैलास पवार, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील याकामी लक्ष ठेवून होते. पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.