शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वालदेवी नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह आले हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 14:06 IST

चेहडी बंधाऱ्याच्या वरील बाजूस असलेल्या महादेव मंदिरालगतच्या एका खडकाच्या खाली पाण्याच्या भोव-यात अजिंक्यचा मृतदेह जवनांना आढळून आला.

ठळक मुद्देगणेश विसर्जनासाठी भाविकांची गर्दी लोटलीअग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले

नाशिक : आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मंगळवारी (दि.१) वालदेवी नदीपात्रात गेलेले दोघे गणेशभक्त बुडून मरण पावले. पहिली घटना देवळाली गावाच्या शिवारात तर दुसरी घटना चेहडी पंपीगस्टेशनजवळ घडली. या दोघांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य क रत बाहेर काढले.नाशिक शहरात तसेच उपनगरीय भागात नदीकाठी सकाळपासून भाविकांची गर्दी कमी होती मात्र दुपारनंतर गोदावरी, नंदिनी, दारणा, वालदेवी अशा सर्वच नद्या व उपनद्यांच्या काठावर गणेश विसर्जनासाठी भाविकांची गर्दी लोटली. यावेळी गणरायाला निरोप देताना देवळाली गाव येथे वालदेवी नदीकिनारी वडारवाडीमधील युवक नरेश नागेश कोळी (३६)हा वालदेवी नदीमध्ये बुडाला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह नाशिकरोड अग्निशमन दलाच्या पथकाच्या हाती लागला. दरम्यान, दुसरी घटना चेहडी पंपिंग स्टेशनजवळील दारणा-वालदेवी नदी संगमावर घडली. या ठिकाणी विसर्जनासाठी गेलेला अजिंक्य राजाभाऊ गायधनी (२२) हा युवक बुडाला. घटनेची माहिती मिळताच रबरी बोट, गळ आदि सामुग्री घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले. यावेळी अजिंक्यचा शोध घेण्याचा प्रयत्न जवानांकडून संध्याकाळी उशिरापर्यंत करण्यात आला; मात्र त्याचा मृतदेह हाती आला नाही. अंधार झाल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली होती. बुधवारी (दि.२) सकाळी मुख्यालयाचे उपअधिकारी उप अधिकारी अनिल जाधव, फायरमन नाना गांगुर्डे, मनोहर गायकवाड, शिवाजी खुळगे, काका आडके, राजू आहेर, रमेश दाते आदींनी चेहडीजवळील वालदेवी नदीपात्रात शोध सुरु केला. यावेळी चेहडी बंधाऱ्याच्या वरील बाजूस असलेल्या महादेव मंदिरालगतच्या एका खडकाच्या खाली पाण्याच्या भोव-यात अजिंक्यचा मृतदेह जवनांना आढळून आला.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलriverनदीGaneshotsavगणेशोत्सवDeathमृत्यूAccidentअपघात