शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सॅनिटायझरचा उडाला भडका; विवाहिता भाजल्याने मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 13:38 IST

महेबुबनगरमध्ये गरीब नवाज मशिदीच्या शेजारी असलेल्या एका चाळीत रजबीया ही विवाहिता पती शाहीद मुलगी अक्सा (३), महेजबीन (६) यांच्यासोबत राहत होती. शाहीद मिळेल ते मोलमोजुरीची कामे करत उदरनिर्वाह करतात

ठळक मुद्देवडाळागावातील महेबुबनगर परिसरात दुर्दैवी घटनेने हळहळ उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि.२४) रजबीयाचे निधन

 

 

: उपचारादरम्यान जिल्हा रूग्णालयात निधन; पती जखमीनाशिक : वडाळागावातील महेबुबनगरमध्ये पत्र्याच्या शेडवजा घरात राहणाऱ्या एक विवाहिता रात्रीच्या सुमारास घरात सॅनिटायझेशन करत होती. यावेळी मेणबत्तीच्या ज्वालेसोबत सॅनिटायझरचा संपर्क होऊन भडका उडाला. या भडक्यात विवाहिता सुमारे ९० टक्क्यांपर्यंत भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रजबीया शाहीद शेख (२४) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने महेबुबनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.कोरोनापासून संरक्षण म्हणून मागील चार महिन्यांपासून निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरचा वापर घराघरांत केला जात आहे. तसेच प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत लहान बाटलीदेखील बाळगताना दिसून येत आहे. सॅनिटायझरचा अतिरेकी वापरदेखील धोकादायक ठरत असल्याचे निष्कर्ष तज्ज्ञांनी दिला आहे. वारंवार सॅनिटायझरचा वापर आरोग्यावर विपरीत परिणाम करणारा ठरतो.महेबुबनगरमध्ये गरीब नवाज मशिदीच्या शेजारी असलेल्या एका चाळीत रजबीया ही विवाहिता पती शाहीद मुलगी अक्सा (३), महेजबीन (६) यांच्यासोबत राहत होती. शाहीद मिळेल ते मोलमोजुरीची कामे करत उदरनिर्वाह करतात तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून रजबीयादेखील लोकांची धुणी-भांडीची कामे करून आपल्या दोन मुलींसह संसाराचा गाडा ओढत होती. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत शाहीद यांचे कुटुंब येथील एका पत्र्याच्या शेडवजा घरात राहत होते. कोरोनापासून संरक्षणासाठी गेल्या सोमवारी (दि. २०) रजबीया हिने रात्रीच्या सुमारास ११ वाजता घरात सॅनिटायझर फवारले. यावेळी वीजपुरवठा खंडीत झाल्याने घरामध्ये मेणबत्ती पेटविण्यात आलेली होती. सॅनिटायझरचा मेणबत्तीच्या ज्वालांशी संपर्क झाल्याने आगीचा भडका उडाला. या भडक्यात रजबीयाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. तिने जोरजोरात ओरडत घराबाहेर धाव घेतली असता तत्काळ पती शाहीद व आजुबाजुच्या महिलांनी धाव घेत तिला विझविण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत विवाहिता गंभीररित्या भाजल्याने तिला तत्काळ उपचारार्थ जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि.२४) रजबीयाचे निधन झाले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार राणे करीत आहेत.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूfireआगAccidentअपघात