बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने रक्ताने रेखाटले चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 04:25 PM2020-01-22T16:25:01+5:302020-01-22T16:33:06+5:30

नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम आणि प्राणापलीकडे काम करणारे अनेक कट्टर शिवसैनिक आहेत. नाशिकचे विजय गवारे हेदेखील त्यापैकी एक असून, शिवसेनाप्रमुख यांचा वाढदिवस (आता जयंती) हे निमित्त करून दरवर्षी ते रक्ताचे चित्र रेखाटतात आणि मातोश्रीवर पाठवत असतात. यंदाही त्यांनी हा उपक्रम राबविला आहे.

Blood drawing on the birth anniversary of Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने रक्ताने रेखाटले चित्र

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने रक्ताने रेखाटले चित्र

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिकच्या विजय गवारे यांचा उपक्रम१९९२ पासून राबविताय उपक्रम

नाशिक :शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम आणि प्राणापलीकडे काम करणारे अनेक कट्टर शिवसैनिक आहेत. नाशिकचे विजय गवारे हेदेखील त्यापैकी एक असून, शिवसेनाप्रमुख यांचा वाढदिवस (आता जयंती) हे निमित्त करून दरवर्षी ते रक्ताचे चित्र रेखाटतात आणि मातोश्रीवर पाठवत असतात. यंदाही त्यांनी हा उपक्रम राबविला आहे.

विजय गवारे मूळचे मुंबईकर असून, ते भायखळ्याला वास्तव्याला असल्यापासून शिवसैनिक म्हणून काम करीत. त्यांना विभागप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. १९९२ पासून त्यांनी रक्ताने छोटे चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. ते १९९५ मध्ये त्यांना नाशिकमध्ये शिवसेनाप्रमुखांमुळेच नोकरी लागली आणि ते नाशिकमध्ये स्थायिक झाले. परंतु त्यानंतरदेखील ते रक्ताचे चित्र काढून मातोश्रीवर पाठवत असतात. आता शिवसेनाप्रमुख नसले तरी त्यांच्यावरील प्रेम कमी झालेले नसून, अजून ते चित्र रेखाटत आहे.

शिवसेनाप्रमुख हे आपले दैवत आहे. यंदाही गवारे यांनी हे चित्र तयार केले असून, अखेरच्या श्वासापर्यंत अशाप्रकारे चित्र रेखाटू असे त्यांनी सांगितले.


 

Web Title: Blood drawing on the birth anniversary of Balasaheb Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.