ईदेमिलाद निमित्ताने रक्तदान शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 02:34 IST2020-11-04T20:20:25+5:302020-11-05T02:34:19+5:30

येवला : येथील सामाजिक विकास बहूउद्देशीय सेवाभावी संस्था व मेट्रो रक्तपेढी जिल्हा ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ईदेमिलाद निमित्ताने शहरातील मिल्लत नगर शादी हॉल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.

Blood donation camp on the occasion of Idemilad | ईदेमिलाद निमित्ताने रक्तदान शिबीर

ईदेमिलाद निमित्ताने रक्तदान शिबीर

ठळक मुद्देशिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते अ‍ॅ. माणिकराव शिंदे यांचे हस्ते झाले.

येवला : येथील सामाजिक विकास बहूउद्देशीय सेवाभावी संस्था व मेट्रो रक्तपेढी जिल्हा ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ईदेमिलाद निमित्ताने शहरातील मिल्लत नगर शादी हॉल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.
शिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते अ‍ॅ. माणिकराव शिंदे यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर काजी मौलाना सलीमोद्दीन हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून लोकमत प्रतिनिधी योगेंद्र वाघ, गोरख पवार, निसारभाई निंबुवाले, अल्केश कासलीवाल, करण देसाई, दादा भाई, पालिका उपमुख्याधिकारी पाटील, सुनील जाधव, सलीम मुकादम, मजीद अन्सारी, मुश्ताक शेख, मलिक मेम्बर सद्दाम भाई आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अ‍ॅड. शिंदे, उपमुख्याधिकारी पाटील, मौलाना सलीमोद्दीन यांची भाषणे झाली. शिबीरात 47 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थाध्यक्ष अजहर शाह यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेट्रो रक्तपेढीचे डॉ. शिवाजी लहाडे, अमोल भोये, शशिकांत पवार, श्रीमती वैशाली मरडे, श्रीमती किरण वैष्णव, श्रीमती योगिता पवार, सागर पगारे, अनिल जोशी, राजकुमार मोरे, भारत मोजाड, नदीम अन्सारी, नूर अन्सारी, फारूक अन्सारी, शाकिर शेख, जावेद अन्सारी, फारूक अन्सारी, फहिम शेख, अनिस शेख आदींनी  परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation camp on the occasion of Idemilad