आशाकिरण वाडी मोगरे येथे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:53 IST2021-03-24T22:41:51+5:302021-03-25T00:53:19+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील आशाकिरण वाडी मोगरे येथे आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहीर उत्तमराव गायकर यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ४५ व्यक्तींनी रक्तदान केले.

आशाकिरण वाडी मोगरे येथे रक्तदान शिबीरप्रसंगी शाहीर उत्तमराव गायकर व इतर मान्यवर
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील आशाकिरण वाडी मोगरे येथे आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहीर उत्तमराव गायकर यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ४५ व्यक्तींनी रक्तदान केले.
२३ मार्च या शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदान दिनानिमित्त देशातील २८ राज्य व आठ केंद्रशासित प्रदेशातील एकूण १५०० स्थळांवरून जवळपास ९० हजार रक्तदाते एकाच वेळी रक्तदान करत होते. या महत राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांचे हस्ते ऑनलाइन झाले. या देशपातळीवर पार पडलेल्या कार्यक्रमाचे औचित्य साधून इगतपुरी तालुक्यातील दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी भेट दिलेल्या आशाकिरणवाडी वाघेरे (मोगरफाटा) या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. उद्घाटन सेवानिवृत कर्नल देविदासजी पोरजे यांच्या हस्ते आणि सेवानिवृत जवान विजय कातोरे, अनिल जाधव व सीआरपीएफ जवान युवराज कुंदे, दौलतराव गांगुर्डे, पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी व आयोजक आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहीर उत्तमराव गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.