रस्त्यावर लाकडे टाकून नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 17:22 IST2020-03-24T17:21:17+5:302020-03-24T17:22:52+5:30

पेठ : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी पेठ तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये खबरदारी घेतली जात असून मुख्य बाजारपेठा ओस पडल्या आहेत. 

 Blockade by cutting wood on the floor | रस्त्यावर लाकडे टाकून नाकाबंदी

रस्त्यावर लाकडे टाकून नाकाबंदी

पेठ : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी पेठ तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये खबरदारी घेतली जात असून मुख्य बाजारपेठा ओस पडल्या आहेत. कुंभाळे येथील ग्रामस्थांनी गावाशी इतरांचा संपर्क येऊ नये यासाठी सर्व बाजूचे रस्तेच बंद करून टाकले. गावाकडे येणार्या रस्त्यावर लाकडे आडवे करून येणार्याना मज्जाव करण्यात आला आहे. युवक गावात येणार्या लोकांना तात्काळ रूग्णालयात जाऊन तपासणी करण्याच्या सुचना देतांना दिसून येतात. याप्रसंगी पेठ तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोये ,बाळू शिंगाडे, प्रताप बोरसे, चंद्रकांत कामडी, योगेश भुरकूड, आदी गावकरी उपस्थित होते.

Web Title:  Blockade by cutting wood on the floor

टॅग्स :Nashikनाशिक