मनमाडला किसान सभेतर्फे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 13:47 IST2021-02-06T13:46:53+5:302021-02-06T13:47:09+5:30
मनमाड : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभा व आयटकच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मनमाडला किसान सभेतर्फे रास्ता रोको
मनमाड : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभा व आयटकच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी व केंद्र सरकारने मंजुर केलेले शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करावे, शेतमालाला हमीभावाचा कायदा करावा, स्वामिनाथन आयोगाची शिफारस लागु करा, दिल्ली येथे अटक केलेल्या शेतकर्यांना सोडुन दया, दिल्ली येथे शेतकर्यांचे जप्त केलेले ट्रक्टर सोडा, शेतकऱ्यांमध्ये घुसुन देशविरोधी कृत्य करणार्या व शेतकर्यांवर दगडफेक करणाऱ्या लोकांवर कार्यवाई करावी या मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले. यावेळी किसान सभा जिल्हा संघटक विजय दराडे, पंडित घुगे , बापु दराडे, मच्छिंद्र यमगर, नवनाथ घुगे, दत्तु दराडे, भारत दराडे, नाना घुगे, संतोष आहिरे, राहुल दराडे, जगन आहिरे, प्रसाद दराडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.