गॅसचा काळाबाजार उघड, पाच वाहनांसह ४५७ सिलिंडर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:12 IST2026-03-18T12:11:05+5:302026-03-18T12:12:33+5:30

टंचाईवर मात करत घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध निर्बंध आणून प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. कोणीही काळाबाजार, अवैध साठा करू नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी यांनी कंपन्यांना दिले आहेत.

Black market of gas exposed 457 cylinders along with five vehicles seized | गॅसचा काळाबाजार उघड, पाच वाहनांसह ४५७ सिलिंडर जप्त

गॅसचा काळाबाजार उघड, पाच वाहनांसह ४५७ सिलिंडर जप्त

नाशिक : सातपूर एमआयडीसी भागात एका गॅस एजन्सीचा काळाबाजार समोर झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडर एका ट्रकमधून दुसऱ्या मालवाहू वाहनांमध्ये भरून अवैधरित्या वाहतूक करण्याच्या प्रयत्नात असताना नाशिक जिल्हा प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून पाच वाहनांसह ४५७ सिलिंडर जप्त केले. त्यात घरगुती वापराचे एचपीसीएलचे १५८, पाच किलो वजनाचे भरलेले दहा व २८९ रिकाम्या सिलिंडरचा समावेश आहे. एकूण २५ लाख ७३ हजार ५६८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 टंचाईवर मात करत घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध निर्बंध आणून प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. कोणीही काळाबाजार, अवैध साठा करू नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी यांनी कंपन्यांना दिले आहेत. तरीही गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

संशयित आरोपी
प्रवीण साळुंखे (रा. हेगडेवार चौक, सिडको), समाधान सोळंकी (रा. केवलपार्क, अंबड), रवींद्र खंडाळे (रा. सातपूर), एजन्सी मालक हर्षल सरनाईक (रा. जलालपूर), सिद्धांत निराळे (रा. सिडको), तेजस आढळकर (रा. कामटवाडे), प्रीतम राजपूत (रा. सातपूर), व्ही. प्रताप (रा. शिवाजीनगर).

Web Title : नाशिक में गैस का काला बाज़ार उजागर: सिलेंडर, वाहन जब्त

Web Summary : नाशिक में सातपुर एमआईडीसी में गैस का काला बाज़ार पकड़ा गया, 457 सिलेंडर और पांच वाहन जब्त। घरेलू गैस सिलेंडरों के अवैध हस्तांतरण के कारण कई संदिग्ध गिरफ्तार। जब्त किए गए सामान की कीमत ₹25.73 लाख है।

Web Title : Gas Black Market Busted in Nashik: Cylinders, Vehicles Seized

Web Summary : Nashik authorities busted a gas black market operation in Satpur MIDC, seizing 457 cylinders and five vehicles. The illegal transfer of domestic gas cylinders led to the arrest of several suspects. The seized goods are valued at ₹25.73 lakhs.