मोदी सरकारविरोधी कामगारांचा काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 17:29 IST2021-05-28T17:29:44+5:302021-05-28T17:29:52+5:30

सिन्‍नर : मोदी सरकारने शेतकरीविरोधी केलेले तीन कायदे, कामगारविरोधी चार श्रम संहिता मागे घ्याव्यात, या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली तरीदेखील मोदी सरकार हे कायदे मागे घेण्यास तयार नाही. या पार्श्‍वभूमीवर माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपनीतील कामगारांनी मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी देवीदास आडोळे यांची तडीपारी मागे घेण्याच्याही घोषणा देण्यात आल्या.

Black day of anti-Modi workers | मोदी सरकारविरोधी कामगारांचा काळा दिवस

मोदी सरकारविरोधी कामगारांचा काळा दिवस

सिन्‍नर : मोदी सरकारने शेतकरीविरोधी केलेले तीन कायदे, कामगारविरोधी चार श्रम संहिता मागे घ्याव्यात, या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली तरीदेखील मोदी सरकार हे कायदे मागे घेण्यास तयार नाही. या पार्श्‍वभूमीवर माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपनीतील कामगारांनी मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी देवीदास आडोळे यांची तडीपारी मागे घेण्याच्याही घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी सिंधू बॉर्डरवर आंदोलन सुरू करून सहा महिने पूर्ण झाले आहेत. तरीदेखील मोदी सरकार हे कायदे मागे घेण्यास तयार नाही. सदर कायदे मागे घ्यावेत. कामगार व शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी आपापल्या शिफ्टनुसार कंपनीच्या गेटजवळ जमून काळे झेंडे दाखविले. काळा दिवस पाळून मोदी सरकारच्या या शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांचा व धोरणांचा निषेध करण्यात आला. कामगारांनी गेटवर सोशल डिस्टन्स ठेवून तोंडाला मास्क लावून आंदोलन केले.

Web Title: Black day of anti-Modi workers

टॅग्स :Nashikनाशिक