नाशिक : महापालिकेतील राजकारणात वर्चस्ववादासाठी स्थायी समिती हे कळीचे स्थान ते आपल्या हाती राहावे यासाठी भाजपातील प्रस्थापितांनी प्रयत्न केले खरे, परंतु दरवेळी ज्यांना काँग्रेसमधून आले असे हिणवले गेले त्याच गटाची सरशी झाली आणि उद्धव निमसे यांना मानाचे पान मिळाले. स्थानिक स्तरावर कोणालाही काही वाटेल, परंतु पक्षाच्या श्रेष्ठींनी मात्र आपले आणि परके असा भाव न ठेवताच निर्णय घेतले हा मुद्दा मात्र भाजपाच्या राजकारणात अधिक अधोरेखित झाला.विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच इच्छुकांना घुमारे फुटू लागले आहेत. शहराध्यक्षपद आणि आमदारकी अशी दुहेरी पदे असलेल्या बाळासाहेब सानप यांच्या होती संघटनात्मक सत्ता एकवटली असली तरी त्यातून गटा तटाचे राजकारणही वाढत गेले. संघटना आपल्या सोयीसाठी लाभासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर अगोदरपासूनच होत आहेत. त्यात एकाच्या बाजूने निर्णय घेतला की दुसरा नाराज या प्रकारामुळे वाद वाढत गेला. पूर्व नाशिकमध्ये अनेक जण विधानसभेत शह देण्यासाठी तयार होऊन बसले. त्यामुळे ताकही फुंकून पिण्याच्या तयारीत असलेल्या बाळासाहेब सानप यांनी अखेरच्या चरणात आपल्या मतदारसंघातील नेते कार्यकर्ते या सर्वांना खूश करण्याचे प्रयत्न सुरू केले त्याचाच एक भाग म्हणून चार विषय समित्यांवरील भाजपाकडून नियुक्त झालेल्या वीस सदस्यांत १२ जण केवळ पूर्व विधानसभेतील मतदारसंघाचे नगरसेवक आहेत. हे स्पष्ट झाल्यानंतर त्याचा आधार घेत स्थायी समितीचे सभापतिपद या मतदारसंघातून जाऊ न देण्याचा अन्य विधानसभा मतदारसंघातील काहींनी चंग बांधला तरी मुळातच स्थायी समितीसाठी लागणारी सर्वप्रकारची सक्षमता दोन तीन जणांकडेच होती.आता विधानसभेचे काय?विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. विद्यमान आमदार आणि शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांना पक्षांतर्गत अनेकांची आव्हाने असून, त्यात स्थायी समितीच्या सभापतिपदाचे दावेदार असलेल्या उद्धव निमसे आणि गणेश गिते यांचा प्रामुख्याने समावेश होता. निमसे यांना सभापतिपद मिळाल्यानंतर त्यांची दावेदारी आता गेली असे मानून सानप यांचा समर्थक वर्ग सुखावला असल्याचे मानणारा समर्थक वर्ग आहे, तर दुसरीकडे बघा पुढे काय होते ते असाही दुसऱ्या गटातून आवाज घुमत आहे. त्यामुळे आता विधानसभेचे चित्र अधिक रंजक होणार आहे.
भाजपातील राजकारणात ‘कॉँग्रेस गटा’ची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:24 IST
महापालिकेतील राजकारणात वर्चस्ववादासाठी स्थायी समिती हे कळीचे स्थान ते आपल्या हाती राहावे यासाठी भाजपातील प्रस्थापितांनी प्रयत्न केले खरे, परंतु दरवेळी ज्यांना काँग्रेसमधून आले असे हिणवले गेले त्याच गटाची सरशी झाली आणि उद्धव निमसे यांना मानाचे पान मिळाले. स्थानिक स्तरावर कोणालाही काही वाटेल, परंतु पक्षाच्या श्रेष्ठींनी मात्र आपले आणि परके असा भाव न ठेवताच निर्णय घेतले हा मुद्दा मात्र भाजपाच्या राजकारणात अधिक अधोरेखित झाला.
भाजपातील राजकारणात ‘कॉँग्रेस गटा’ची सरशी
ठळक मुद्देवर्चस्ववादाची स्पर्धा ; विधानसभेची पार्श्वभूमी