शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

सांगलीतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपाची खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 8:23 PM

नाशिक- सांगली महापालिकेत भाजपाचे बहुमत असताना आठ नगरसेवक फुटले आणि राष्ट्रवादीने बाजी मारली. त्यामुळे अशा प्रकारे नाशिक महापालिकेची तिजोरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी भाजपाने खेळी केली आणि पक्षातील निष्ठावंतांना संधी दिली. सभापतीपदाची निवडणूक संपल्यानंतर यातील किमान दोन सदस्य राजीनामा देतील आणि त्या जागी नवीन सदस्य नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देहंगामी सदस्य: किमान दोन सदस्य नंतर राजीनामा देऊन अन्य सदस्यांना संधी देणार

नाशिक- सांगली महापालिकेत भाजपाचे बहुमत असताना आठ नगरसेवक फुटले आणि राष्ट्रवादीने बाजी मारली. त्यामुळे अशा प्रकारे नाशिक महापालिकेची तिजोरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी भाजपाने खेळी केली आणि पक्षातील निष्ठावंतांना संधी दिली. सभापतीपदाची निवडणूक संपल्यानंतर यातील किमान दोन सदस्य राजीनामा देतील आणि त्या जागी नवीन सदस्य नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यत्वासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी बुधवारी (दि. २४) विशेष महासभा बोलवली होती. यात खरे तर आठ सदस्यांची नियुक्ती करणे अपेक्षित असताना सोळा सदस्यांची नव्याने घोषणा करण्यात आली. त्यात भाजपाकडून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या गणेश गीते यांना पक्षाने पुन्हा संधी देऊन सत्तेसाठी कोणत्याही प्रकारची व्यूहरचना केली जाऊ शकते, असे स्पष्ट केले आहे. गीते यांना संधी देण्यामागे तेच स्थायी समिती भाजपच्या हातून जाऊ देणार नाही, अशी खात्री करून त्यांनाच सभापती करणार असल्याचे जणू संकेत देण्यात आले आहेत. तर पक्षाकडून अनेक ज्येष्ठ नगरसेवक इच्छुक असताना डावा उजवा निर्णय घेतल्याचा आरोप होऊ शकतो. त्यातच सभापतीपदासाठी उमेदवार दिल्यानंतर असंतुष्ट गटाचा फटका बसू शकतो, याचा विचार करून पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली असली तरी हिमगौरी आडके आणि रंजना भानसी या केवळ हंगामी सदस्य आहेत. सभापती पदाची निवडणूक संपली की पक्षातील ज्या नगरसेवकांना संधी द्यायची आहे, त्यांना ती मिळावी, यासाठी या दोघी राजीनामा देऊन जागा मोकळी करून देणार असल्याचेदेखील सांगण्यात येत आहेत.महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडे अनेक इच्छुक आले आणि त्यांना पक्षाने संधी दिली; मात्र राज्यातील सत्ता बदल झाल्यानंतर अनेकांना परतीचे वेग लागले आहेत. अशावेळी समितीने संधी दिल्यानंतरदेखील ते भाजपच्या बाजूने उभे राहतील, याची खात्री नसल्याने ह्यजाणाऱ्यांमुळेह्ण तरी स्थायी समितीची सत्ता हातून जाऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे. आमदार सीमा हिरे यांच्या मतदार संघातील असलेल्या आणि नसलेल्या योगेश हिरे यांच्यासह साऱ्यांना संधी देतानाच आमदार देवयानी फरांदे यांच्या सूचनेनुसार दोन नवीन सदस्य हंगामी सदस्यांचे राजीनामे घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. एक सदस्य तर नवे शहर प्रभारी जयकुमार रावल यांचे निकटवर्तीय असून, त्यामुळे रावल यांनीही महापालिकेत यानिमित्ताने आपल्या निकटवर्तीयांचे खाते खोलले आहे.इन्फो..निवडणुकीचे वर्ष असल्याने भाजपात फाटाफुट होणार आहेच, विशेषत: अन्य पक्षातून आलेला एक गट मार्गस्थ होण्याच्या तयारीत आहे; परंतु त्यांनादेखील यानिमित्ताने पक्षाने संदेश देऊन टाकला आहे, तर पक्षातील निष्ठावान मात्र या निर्णयाचे स्वागत करताना पुन्हा संधी मिळेल, अशी अपेक्षा बाळगून आहे. अरुण पवार यांच्यासारख्यानेदेखील नाराजी व्यक्त न करता पक्षाचे आदेश मान्य, एवढीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.भाजपचे सदस्य सहलीवर...स्थायी समितीची फेररचना केल्यानंतर पक्षाचे सदस्य सहलीवर रवाना झाले आहेत. खरे तर विद्यमान समितीच्या सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत असून, त्यानंतर नूतन सभापती पदाच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला जाईल. ते निवडणूक कार्यक्रम घोेषित करतील; परंतु त्याची प्रतीक्षा न करताचा भाजपने तटबंदीसाठी आपले बहुतांश सदस्य रवाना केले आहेत.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारण