शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बहुमताचा आकडा जुळवण्यावरून भाजप आघाडीची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:43 AM

महापौरपदासाठी लागणाऱ्या बहुमताची जादू म्हणजेच ६१ नगरसेवकांचे पाठबळ मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. संभाव्य फुटीर नगरसेवकांची संख्या गृहीत धरून भाजपने मेळ घालणे सुरू केले असून, त्यासंदर्भात विरोधी पक्षांशीदेखील चर्चा करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

नाशिक : महापौरपदासाठी लागणाऱ्या बहुमताची जादू म्हणजेच ६१ नगरसेवकांचे पाठबळ मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. संभाव्य फुटीर नगरसेवकांची संख्या गृहीत धरून भाजपने मेळ घालणे सुरू केले असून, त्यासंदर्भात विरोधी पक्षांशीदेखील चर्चा करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शिवसेनेने कॉँग्रेस-राष्टवादी आपल्याच बरोबर राहील, अशी खात्री बाळगली असली तरी त्यांच्या मागण्या वाढत चालल्या असून, अशावेळी भाजप आणि सेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.शुक्रवारी (दि.२२) होणाºया महापौरपदाच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू आहे. महापालिकेत १२२ निर्वाचित नगरसेवकांची संख्या असून, त्यात महापालिकेचे पूर्ण बहुमत आहे. सध्या भाजपकडून निवडून आलेल्या सरोज अहिरे आणि शिवसेनेच्या दिलीप दातीर यांनी राजीनामा दिल्याने सध्या एकूण १२० नगरसेवक आहेत. बहुमताचा जादुई आकडा ६१ इतका आहे. भाजपकडे सध्या ६५ नगरसेवक आहेत. त्यातील आठ नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकला तरी ५७ नगरसेवक होतात. तर दुसरीकडे शिवसेनेचे ३४ नगरसेवक आहेत. त्यात कॉँग्रेस आणि राष्टÑवादीचे एकूण बारा, त्यांच्याशी गठबंधन असलेले दोन अपक्ष असे सर्व गृहीत धरले तरी ४८ संख्या होते.मनसेचे पाच नगरसेवक आणि एक अपक्ष असे सहा जण महाआघाडीत सहभागी होणार किंवा नाही याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे शिवसेनेला बहुमताचा आकडा गाठणेदेखील सोपे नाही. दरम्यान, भाजपनेदेखील विरोधी पक्षांशी बोलणी सुरू केल्याचे वृत्त असून, त्यामुळे सत्तेचा सारा खेळ अनिश्चित झाला आहे.कॉँग्रेस-राष्टÑवादीला हवे उपमहापौरपदशिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेस सकारात्मक असले तरी त्यांनादेखील सत्तेत सहभाग हवा आहे. कॉँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी यासंदर्भात स्पष्ट करताना एकदा सत्ता स्थापन झाली की, संबंधित पक्ष मदत घेणाऱ्यांची आठवण ठेवत नाही. त्यामुळे कॉँग्रेसला सत्ता हवी आहे, असे सांगितले. कॉँग्रेसकडून उपमहापौरपदासाठी दोन अर्ज दाखल असून, राष्टÑवादीकडून एक अर्ज दाखल झाला आहे.मनसेचा आज फैसलामहाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिकेत भाजपला पाठिंबा द्यायचा की शिवसेनेला याबाबत कोणताही निर्णय झालेला नसून गुरुवारी (दि.२१) यासंदर्भात निर्णय होणार आहे. राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार मनसेचे नगरसेवक मुंबईत असून, सकाळी ९ वाजता राज यांनी त्यांना बोलविले आहे. त्यामुळे सकाळीच याबाबत फैसला होणार आहे. मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी याबाबत माहिती दिली.शिवसेनेचा मात्र ६५ नगरसेवकांचा दावामहानगरपालिकेच्या सत्तेसाठी बहुमताचा आकडा जुळवण्याची कसरत सुरू असली तरी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी मात्र शिवसेनेकडे सर्व मिळून एकूण ६५ नगरसेवक असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे भाजपनेदेखील बहुमत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता नेमका कुणाचा दावा खरा ठरतो हे उद्याच दिसून येईल.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरElectionनिवडणूकBJPभाजपा