शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

राष्ट्रवादीच्या हल्लाबोलवर भाजपचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 17:12 IST

नाशिक जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस व भाजपावर टीकेची झोड उठवल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांनी शरद पवार यांच्यावर रविवारी (दि.11) पलटवार केला. अनेक वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शरद पवारांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका फरांदे यांनी केली आहे. 

ठळक मुद्देशरद पवारांना शेततकऱ्यांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीदेवयानी फरांदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनावर टिका विरोधकांचा समृद्धी महामार्गात खोडा घालण्याचा प्रयत्न, भाजपाचा आरोप

नाशिक : जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस व भाजपावर टीकेची झोड उठवल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांनी शरद पवार यांच्यावर रविवारी (दि.11) पलटवार केला. अनेक वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शरद पवारांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका फरांदे यांनी केली आहे. नाशिकला राज्याच्या अर्थसंकल्पात सापत्न वागणूक मिळाल्याच्या चर्चेने जोर धरला असतानाच हल्लाबोल आंदोलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री व भाजपावर झालेल्या बोच:या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे रविवारी (दि. 11) पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती देत पक्षाची भूमिका मांडली. देवयानी फरांदे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या सरकारने त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही. सिंचन, वीज घोटाळा करून राज्याला भ्रष्टाचाराच्या दरीत लोटले. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार सर्वसामान्यांसाठी काम करीत असून, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात सर्वसामान्य शेतकरी व कृषी क्षेत्रसाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूरदरम्यानची विविध शहरे मुंबईशी जोडली जाणार असून, स्मार्ट शहरांसोबतच ड्रायपोर्ट, शीतगृहेही उभारण्यात येणार असल्याने राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. परंतु, विकासाच्या विरोधी भूमिका असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य डावे पक्ष मिळून समृद्धी महामार्गात खोडा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगणांऱ्या शरद पवारांना शेतकऱ्यांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही फ रांदे म्हणाल्या. दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिकसाठी काय तरतूद आहे याविषयी विचारलेल्या प्रश्नांना आमदार देवयानी फरांदे आणि बाळासाहेब सानप यांनी बगल देत नाशिकसाठी सिंहस्थ कुंभमेळ्यासह विविध योजनांमधून सुरू असलेल्या कामांचा उल्लेख करून पत्रकार परिषद गुंडाळली. यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ता सुहास फरांदे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

कौशल्य विद्यापीठाची मागणी करणारराज्याच्या अर्थसंकल्पात नाशिकच्या हाती काहीही लागलेले नाही. त्यामुळे नाशिककरांची नाराजी दूर करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात सहा कौशल्य विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ नाशिकला मिळावे यासाठी मागणी करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गBJPभाजपा