शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

 आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे भाजपचे षडयंत्र; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

By प्रसाद गो.जोशी | Updated: October 27, 2023 17:58 IST

राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची सत्ता असल्याने सध्या राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे.

मालेगाव (नाशिक) : राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची सत्ता असल्याने सध्या राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे - पाटील आंदोलन करीत आहेत. जरांगे- पाटील यांचे आंदोलन उभे राहिल्यानंतर धनगर, आदिवासी कोळी, ओबीसी समाजाला एकमेकांच्या विराेधात समोरासमोर उभे केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र भाजप सरकारकडून आखले जात आहे. आरएसएस संघटनेचा जातीयता, भांडणे वाढविणे, जाती - जातींमध्ये कलह निर्माण करणे, हा मुख्य अजेंडा असल्याचा आराेप वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मालेगाव तालुका दौऱ्यावर असताना डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. आंबेडकर म्हणाले की, हिंदू धर्मात वैदिक आणि संत परंपरा असे दोन भाग पडतात. त्यातील संतांच्या परंपरेवर चालणारा समाज माणुसकी व एकात्मता, एकमेकांचा मानसन्मान करण्यास शिकविते व वारीच्या माध्यमातून सहजीवनाचे दर्शन घडवून शांतीचा संदेश देणारा समाज आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरणाराही समाज आहे. मनुस्मृतीवर आधारित असलेला वैदिक हिंदू समाज तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप डॉ. आंबेडकर यांनी केला. दिवाळीनंतर दंगली घडविण्याची शक्यताराज्यात असलेले शिंदे सरकार बरखास्त करून पुन्हा सत्तेवर यायचे आहे. त्यासाठी हिंदू - मुस्लीम व अन्य समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आतापासून तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. त्यामुळे दिवाळीनंतर गोध्रासारख्या दंगली देशात घडू शकतात. यासाठी जनतेने आतापासून सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन डॉ. आंबेडकर यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर