कावनई तीर्थक्षेत्र येथे भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 17:19 IST2020-08-29T17:18:42+5:302020-08-29T17:19:37+5:30
नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील सर्व धार्मिक स्थळे, पूजाविधी आदी. बंद करण्यात आले असून, अनेक दिवसांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्यात यावीत या संदर्भात इगतपुरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या कावनई येथील कपिलधारा तीर्थक्षेत्रावर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

इगतपुरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कावनई येथील कपिलधारा तीर्थक्षेत्रावर घंटानाद आंदोलन करताना भाऊसाहेब कडभाने, लालचंद पाटील, दिनेश कोळेकर आदी.
नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील सर्व धार्मिक स्थळे, पूजाविधी आदी. बंद करण्यात आले असून, अनेक दिवसांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्यात यावीत या संदर्भात इगतपुरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या कावनई येथील कपिलधारा तीर्थक्षेत्रावर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी तालुका संघटक सरचिटणीस तानाजी जाधव, कैलास कस्तुरे, जिल्हा चिटणीस दिनेश कोळेकर, युवाध्यक्ष लालचंद पाटील, इगतपुरी शहराध्यक्ष सागर हंडोरे, घोटी शहराध्यक्ष जगन भगत, पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब पवार, उपाध्यक्ष कैलास भोर, युवा सरचिटणीस भाऊसाहेब धोंगडे, योगेश सोनवणे, संजय रायसोनी, विष्णू मालुंजकर, भरत सहाणे, राजाराम शिरसाट, सोमनाथ सहाणे आदी उपस्थित होते.