शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मुंढे यांची बदली करूनही भाजपा चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:33 IST

भ्रष्टाचार विरोधी व कायद्याच्या कसोटीवरच काम करणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करून भाजपाचे मुखंड उत्साह व जल्लोष साजरा करीत असले तरी, मुंढे यांची जनमानसातील प्रतिमा पाहता, त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करून भाजपाने आपला खरा चेहरा समोर उघड केल्याची भावना जनमानसात व्यक्त केली जात असल्याने भाजपाच्या एका गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपक्षीय प्रतिमेचा प्रश्न : आयुक्तांच्या बदलीचे श्रेय घेणे अंगलट येण्याची शक्यता

नाशिक : भ्रष्टाचार विरोधी व कायद्याच्या कसोटीवरच काम करणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करून भाजपाचे मुखंड उत्साह व जल्लोष साजरा करीत असले तरी, मुंढे यांची जनमानसातील प्रतिमा पाहता, त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करून भाजपाने आपला खरा चेहरा समोर उघड केल्याची भावना जनमानसात व्यक्त केली जात असल्याने भाजपाच्या एका गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खुल्यापणाने हा गट मुंढे यांच्या बदलीच्या प्रकरणात जाहीरपणे काही बोलत नसला तरी, आगामी निवडणुकीत जनतेकडून मुंढे यांच्या बदलीबाबत जाब विचारल्यास काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला आहे.गेल्या सहा महिन्यांपासून भाजपाचे लोकप्रतिनिधी व नगरसेवक आयुक्त मुंढे यांच्या कामकाजात अडथळे निर्माण करून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्नशील होते. परंतु मुंढे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यामुळे शक्य होत नव्हते. मुंढे यांनी आपल्या पद्धतीनेच कारभार हाकण्याबरोबरच, सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी, गटार या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. परिणामी मुंढे जनतेत लोकप्रिय तर झालेच, परंतु काम न करणाºया महापालिकेच्या अधिकाºयांना नकोसे तर नको त्या कामात ‘अर्थ’ शोधणाºया लोकप्रतिनिधींना अडचणीचे ठरले होते. लोकांना जे हवे ते देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबवून नागरिकांच्या मनपाच्या संबंधित तक्रारी अवघ्या चोवीस तासात सोडविण्यास सुरुवात केल्याने त्यांना जनमानसातून मिळत असलेला पाठिंबा सत्ताधारी भाजपाच्या जिव्हारी लागला होता. त्यातूनच मुंढे जर आणखी काहीकाळ नाशकात थांबले तर भाजपासाठी ते अडचणीचे ठरणार असल्यामुळेच त्यांच्या बदलीचा प्रश्न प्रतिष्ठेचा करण्यात आला. मुंढे यांची आता बदली झाली असली तरी, मुंढे यांच्या कामकाजावर समाधानी असलेल्या नाशिककरांच्या नाराजीचा सामना भाजपाला करावा लागणार आहे.प्रतिमा मलीन : पक्षांतर्गत दोन गटमुंढे यांच्या कायदेशीर कामकाजामुळे मूठभरच लोकांना त्रास झाला व ज्यांना झाला त्यांचा जनमानसातील वावर अगदीच अल्प आहे. त्यांच्यापासून पक्षाला कितपत फायदा होईल, असा विचार आता भाजपातील मंडळी करू लागली असून, निव्वळ महापालिकेतून स्वहित साधण्यासाठीच मुंढे यांच्या बदलीला प्रतिष्ठेचा प्रश्न करणाºयांमुळे भाजपाला नुकसानच होण्याची भीती खासगीत व्यक्त होऊ लागली आहे. अशातच काही लोकप्रतिनिधी जाहीरपणे मुंढे यांच्या बदलीचे समर्थन करीत असल्यामुळे तर भाजपा भ्रष्टाचाराला पाठिंबा देते, असा संदेश जनमानसात गेला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढेBJPभाजपा