शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:20 IST

काही निर्णय ऐनवेळी बदलू शकतात मात्र मनासारखे झाले नाही म्हणून अंगावर यायचे, हातघाई करायची हे योग्य नाही. ही बाब प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्‍यांच्या कानावर घालेन असं महाजन यांनी सांगितले.

नाशिक - महापालिकेत १२२ जागा आहेत आणि इच्छुकांची संख्या हजारात आहे. त्यामुळे काही ठिकाणी नाराजी होणारच आहे. तिकीट न मिळाल्याने काही कार्यकर्ते नाराज होतात. ८० टक्के जुने लोक आहेत त्यांनाच तिकीट दिली आहे. नाशिकमध्ये जे झाले ते चुकीचे आहे. अनेक इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे अनेकांना तिकीट हवं असे वाटत होते. त्यात एबी फॉर्म वाटप जिथे सुरू होते तिथे १००-१५० कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. सगळ्यांना पक्षाचे तिकिट हवे असते परंतु जागा कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्याने हा गोंधळ झाला असं सांगत याची चौकशी करू असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. 

नाशिक भाजपा कार्यकर्त्यांच्या राड्याप्रकरणी गिरीश महाजन म्हणाले की, एबी फॉर्म देताना हे घडणे चुकीचे होते. कार्यकर्त्यांनी जो गोंधळ घातला तो अयोग्य होता. या कार्यकर्त्यांना कुणी खतपणी घातले याची चौकशी करून कारवाई करू. १२२ तिकीटे आहेत, सगळ्याच कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नाही. त्यात काही नवीन आलेले लोक आहेत त्यांनाही डावलता येत नाही. ते अपेक्षेने पक्षात आले होते. त्यामुळे हातघाईवर येणे हा प्रकार दुर्दैवी आहे. मी ८ दिवसांपासून नाशिकमध्ये आहे. सगळ्यांशी बोलणे झाले, चर्चा करून निर्णय घेतलेत. काही निर्णय ऐनवेळी बदलू शकतात मात्र मनासारखे झाले नाही म्हणून अंगावर यायचे, हातघाई करायची हे योग्य नाही. ही बाब प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्‍यांच्या कानावर घालेन असं त्यांनी सांगितले.

तसेच तिकीट वाटपात कुठेही आर्थिक व्यवहार झाला नाही. जर कुणी असा आरोप करत असेल तर त्याची चौकशी केली जाईल. १ कोटी असो वा ५ लाख कुणाकडे माहिती असेल तर त्यांनी द्यावी. ज्यांना तिकीट मिळाले त्यांनाही तुम्ही कुणाला पैसे दिलेत का अशी विचारणा करू. कुणी तुमच्याकडे पैसे मागितले का असं विचारू. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. उगाच विनाकारण कुणी हवेत आरोपांचे गोळीबार करू नयेत असं सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपावर भाष्य केले आहे.

दरम्यान, तिकीट कापले गेलेत म्हणून आरोप होणार आहेत. आमच्याकडे तिकिटांची मागणी खूप आहे. त्यात तिकीट मिळाले नाही म्हणून पैशांचा आरोप करायचा हे सर्रास बघायला मिळतेय. परंतु यावर नक्कीच चौकशी केली जाईल. बाहेरून अनेक लोक आपल्या पक्षात आले आहेत परंतु आपण जुन्या लोकांना उमेदवारीत मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले आहे. आता बाहेरच्या पक्षातील काही मोठे पदाधिकारी आपल्याकडे आले आहेत. त्यांनाही थोडेफार आपल्याला द्यावे लागेल. ८० टक्के जुनेच लोक आहेत. २० टक्के नवीन लोक आहेत. पक्षाने ३-३ सर्व्हे केले आहेत. ते बघूनच जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी दिली आहे असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik BJP Workers' Uproar: Ticket Distribution Accusations, Mahajan Promises Inquiry

Web Summary : BJP workers in Nashik protested alleged bribery in ticket distribution. Minister Girish Mahajan pledged an inquiry into the chaos and accusations, denying financial misconduct. He emphasized prioritizing experienced members, balancing newcomers, and basing nominations on surveys despite dissent.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Nashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजन