शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा ठाण्याची भरपाई नाशिकला मागणार?

By admin | Updated: August 16, 2016 23:12 IST

पदवीधर निवडणूक : शिवसेनेला घालणार मदतीसाठी साकडे

नाशिक : आगामी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करून भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधी कॉँग्रेस व राष्ट्रवादीवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे. त्यातच ठाणे येथे शिवसेना उमेदवाराला मदत करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी धाव घेतल्याने त्याची भरपाई म्हणून नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला मदत करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झाल्याचे वृत्त आहे.ठाणे येथील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांना विजयी करण्यासाठी तसेच दगाबाजी नको म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या नगरसेवकांसह अन्य मतदारांना शिवसेनेला मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळेच वसंत डावखरे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक विजयी झाले होते. आता राज्यात नाशिकसह अमरावती येथील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात भाजपाच्या वतीने नाशिकमधून डॉ. प्रशांत पाटील यांना, तर अमरावतीतून गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ तसे पाहिले तर भाजपाच्या ताब्यात राहिलेला मतदारसंघ आहे. तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचे शालक डॉ. सुधीर तांबे यांना कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळून ते विजयी झाले. तत्पूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व प्रताप सोनवणे व त्यापूर्वी ना. स. फरांदे यांनी केले आहे. शिवसेनेनेही भाजपाला विरोध म्हणून पदवीधर मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याची तयारी केल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात शिवसेनेकडे पदवीधरसाठी अद्याप तरी कोणी तयारी दर्शविली नसल्याचे सेनेच्या एका नेत्याने खासगीत बोलताना सांगितले; मात्र काही दिवसांपूर्वीच कॉँग्रेसच्या एका माजी नेत्याने शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने चचेला उधाण आले होते. दुसरीकडे ठाण्यात शिवसेनेला मदत केली म्हणून, भाजपा नाशिक पदवीधर मतदारसंघात त्याची भरपाई म्हणून शिवसेनेने मदत करण्याची मागणी करू शकते. तसे झाले तर पदवीधर मतदारसंघात एकास एक लढत होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)