भाजपास यश; मालेगावी जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:21 IST2018-12-10T23:20:47+5:302018-12-10T23:21:41+5:30
आझादनगर : धुळे महानगरपालिका निवडणूकीत भाजपास घवघवीत यश मिळाल्याने भाजपा अल्प संख्याक मोर्चाच्या वतीने मालेगाव शहरात मुस्लिम बहुल भागात जल्लोष साजरा करण्यात आला.

धुळे महापालिकेत भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर मालेगावी जल्लोष करताना भाजपाचे कार्यकर्ते.
आझादनगर : धुळे महानगरपालिका निवडणूकीत भाजपास घवघवीत यश मिळाल्याने भाजपा अल्प संख्याक मोर्चाच्या वतीने मालेगाव शहरात मुस्लिम बहुल भागात जल्लोष साजरा करण्यात आला. धुळे महानगरपालिका निवडणूकीचा सोमवारी निकाल जाहीर झाला. त्यात भाजपाने घवघवीत यश मिळवित स्वपक्षाचे विरोधक आमदार अनिल गोटे यांच्या पक्षाचा दारुण पराभव केला. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला.
भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव इब्राहिम शेख व कार्यकर्ते यांनी शहरातील मुस्लिमपुरा भागात सवाद्य मिरवणुक काढून जल्लोष साजरा केला. यावेळी एकलाख अहमद, जाबीर खान, शेख समद, शेख नुर, रहेमान शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.