शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

भाजपाचे आमदार लागले कामाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:17 AM

देशातील पाच राज्यांतील निकालामुळे भाजपाचे आमदार धास्तावले असून, प्रलंबित कामे मंजुरीचा आणि मंजूर कामांच्या भूमिपूजनाचा बार उडविण्याची तयारी सुरू झाली आहे.

नाशिक : देशातील पाच राज्यांतील निकालामुळे भाजपाचेआमदार धास्तावले असून, प्रलंबित कामे मंजुरीचा आणि मंजूर कामांच्या भूमिपूजनाचा बार उडविण्याची तयारी सुरू झाली आहे.  नाशिक जिल्ह्यात भाजपाचे चार आमदार आहेत, पैकी डॉ. राहुल अहेर हे चांदवड-देवळा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. तर नाशिक शहरात चारपैकी तीन आमदार भाजपाचे आहेत. पाच राज्यांतील निकालांच्या पार्श्वभूमीवर हे आमदार कामाला लागले आहेत. यापूर्वी पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात आपणच विजयी होणार असल्याचे सांगणाऱ्या आमदारांनी प्रलंबित कामे करण्यासाठी मात्र धावपळ सुरू केली आहे. नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून असताना त्यांनी आमदार निधीतील बहुतांशी कामे ना हरकत दाखल्याअभावी अडवली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ही कामे होणार असली तरी त्यासाठी समाजमंदिर आणि अन्य कोणत्याही प्रकल्पांची नंतर दुरुस्ती देखभालीची जबाबदारी महापालिकेवर येत असल्याचे निमित्त करून मुंढे यांनी पंचवटीत नाट्यगृह, गंगापूररोडवर तरण तलाव अशा अनेका कामांवर फुली मारली होती; परंतु मुंढे यांच्या बदलीमुळे हा मार्गही मोकळा झाल्याने महपालिकेकडून प्रलंबित कामांना हिरवा कंदील मिळू लागला आहे.नाशिक शहरात राज्य शासनाच्या निधीतून पंचवटीत नाट्यगृह, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाची इमारत, काळाराम आणि कपालेश्वरचे नूतनीकरण ही कामे, तर मध्य नाशिकमध्ये महिला रुग्णालय, यशवंत व्यायामशाळा नूतनीकरण, आगर टाकळी परिसराचा विकास, आकाशवाणी केंद्राजवळ तरण तलाव या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भूमिपूजन करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. समाजमंदिर, ग्रीन जिम सुरू करणे शाळांना ई लर्निंगचे साहित्य पुरविणे अशी अनेक पारंपरिक कामेदेखील वेगाने सुरू झाली आहेत.गयारामही तयारीत...राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर अन्य पक्षातील अनेक आयाराम भाजपात आले आहेत; मात्र आता भाजपाच्या विरोधी वातावरणाचा रोख बघताच अन्य पक्षांमध्ये जाण्याच्या तयारीतही काही जण आहेत. पूर्व नाशिक आणि मध्य नाशिकमधील असे काही इच्छुक अन्य पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे तर अपूर्व हिरे यांनी अगोदरच राष्टÑवादीत प्रवेश केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदार