भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले काळारामाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 16:44 IST2024-01-09T16:42:51+5:302024-01-09T16:44:44+5:30
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंचवटी येथील काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेत पुजा केली.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले काळारामाचे दर्शन
नाशिक : शेतकऱ्यांवरील नैसगिर्क संकट दूर कर आणि अयोध्येतील राममंदिराचा सोहळा कोणत्याही अडथळ्याविना पार पडू दे असे साकडे घालत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंचवटी येथील काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेत पुजा केली. यावेळी त्यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली.
यावेळी त्यांच्यासमवेत ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीष महाजन, केंद्रीय मंत्री खा. डॉ. भारती पवार, आमदार राहूल ढिकले, विजय चौधरी, महंत सुधीरदास पुजारी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी यांसह मान्यवर उपस्थित होते. काळाराम मंदिराचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर, शुभम मंत्री, डॉ. एकनाथ कुलकर्णी यांसह विश्वस्त आणि पुजारी परिवारातर्फे बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.