शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
2
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
3
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
4
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
5
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
6
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
7
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
8
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
9
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
11
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
12
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
13
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
15
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
16
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
17
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
18
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
19
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
20
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम

भाजपने गमावले, राष्टÑवादीने कमावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:11 IST

लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणाऱ्या भाजपच्या सर्व प्रकारच्या खेळींना जिल्ह्यात राष्टÑवादीने त्याच भाषेत प्रत्युत्तर देत ऐन उमेदवारी वाटपात त्याची परतफेड केली. भाजपच्याच नाराजांना आपल्या जाळ्यात ओढून काही ठिकाणी भाजपसमोर, तर काही मतदारसंघांमध्ये सेनेवर राष्टÑवादीने मात केली. ऐनवेळी पक्षप्रवेश व उमेदवारीचे वाटप करत राष्टÑवादीने सामाजिक समीकरणे साधून आपली ‘बहुजन’ प्रतिमा उजळविण्याची संधी यानिमित्ताने साधून घेतली.

ठळक मुद्देअखेरच्या क्षणी खेळी : बहुजन समाजाला प्रतिनिधित्व

नाशिक : लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणाऱ्या भाजपच्या सर्व प्रकारच्या खेळींना जिल्ह्यात राष्टÑवादीने त्याच भाषेत प्रत्युत्तर देत ऐन उमेदवारी वाटपात त्याची परतफेड केली. भाजपच्याच नाराजांना आपल्या जाळ्यात ओढून काही ठिकाणी भाजपसमोर, तर काही मतदारसंघांमध्ये सेनेवर राष्टÑवादीने मात केली. ऐनवेळी पक्षप्रवेश व उमेदवारीचे वाटप करत राष्टÑवादीने सामाजिक समीकरणे साधून आपली ‘बहुजन’ प्रतिमा उजळविण्याची संधी यानिमित्ताने साधून घेतली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्टÑवादीने चाललेल्या राजकीय चाली पाहता, निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांचे हिशेब चुकते करण्यात राष्टÑवादी यशस्वी झाली आहे.विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात युतीविरुद्ध आघाडी अशीच लढत होत असली तरी, काही मतदारसंघांमध्ये मात्र तिरंगी वा चौरंगी लढतीचे चित्र आहे. युतीच्या जागावाटपात सेनेपेक्षा भाजपत राजी-नाराजीचे अधिक प्रदर्शन झाल्याने त्याचा पुरेपूर लाभ उठविण्याचा प्रयत्न राष्टÑवादी कॉँग्रेसने केला आहे. भाजपत पंचवीस वर्षे सक्रिय राहिलेल्या आमदार बाळासाहेब सानप यांना गळास लावून नाशिक पूर्वमधून राष्टÑवादीने नुसतीच उमेदवारी दिली नाही, तर भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले, त्याच प्रकारे देवळाली मतदारसंघातून भाजपच्याच नगरसेविकेस उमेदवारी देऊन शिवसेनेच्या उमेदवाराला घाम फोडला आहे. सिन्नर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासमोर उमेदवारी देताना राष्ट्रवादीने खेळी खेळली. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करणारे भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनाच राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवारी बहाल केली. त्यामुळे या मतदारसंघात सेनेसमोर राष्टÑवादी कॉँग्रेस अशी सरळ लढत होणार आहे. कळवण मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाशी मैत्रिपूर्ण लढत देत असतानाच, नाशिक पश्चिम मतदारसंघात माकपाला थेट पाठिंबा जाहीर करून भाजप उमेदवार सीमा हिरे यांच्यासमोर लढत उभी केली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाºया देवळाली मतदारसंघात भाजपच्या नगरसेवक सरोज अहिरे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवारी अर्ज भरण्यास भाग पाडले. भाजपच्या अहिरे यांच्यामुळे शिवसेनेपुढे पेच निर्माण झाला असून, घोलप यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे.मालेगाव बाह्य मतदारसंघात राष्टÑवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याचे पाहून राष्ट्रवादीने आपल्या वाट्याचा मतदारसंघ कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्यासाठी सोडला. शेवाळे यांच्या पाठीशी समविचारी पक्षांना एकत्र आणण्यात राष्टÑवादी यशस्वी झाल्याने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना जाळ्यात ओढून ऐनवेळी उमेदवारी दिली व त्यानिमित्ताने भाजप व पर्यायाने राहुल ढिकले यांचाही वचपा काढला आहे.प्रवेशद्वारापाशी गळ्यात घातले राष्ट्रवादीचे उपरणे !उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या आमदार बाळासाहेब सानप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केल्यानंतरदेखील कोणत्याही पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे, झेंडा किंवा पक्ष दर्शविणारे चिन्ह जवळ ठेवले नव्हते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना जेव्हा ते अखेरच्या क्षणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमध्ये आले, त्यावेळी त्यांना कार्यकर्त्याने राष्टÑवादीचे उपरणे दिल्यावर त्यांनी ते खांद्यावर घेत त्या क्षणापासून पक्षांतर केल्याचे अधोरेखित झाले.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही ‘चरणस्पर्श’ !४उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणारे बहुतांश उमेदवार दिसणाºया प्रत्येकाला हात हलवून अभिवादन करीत पुढे मार्गक्रमण करीत होते. मात्र, ऐनवेळी दाखल होऊन नाशिक पश्चिममधून उमेदवारी मिळवल्याने प्रचंड उत्साहित झालेले मनसेचे उमेदवार दिलीप दातीर हे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिसणाºया ज्येष्ठांनादेखील ‘चरणस्पर्श’ करीत पुढे जात होते. त्यावेळी ‘हा खरा पारंपरिक उमेदवार’ अशा चर्चेला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बहर आला होता.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस