शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

शहरात तिन्ही जागांवर भाजपचे वर्चस्व कायम; देवळालीत सेनेच्या बालेकिल्ल्यात घड्याळाची टिकटिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 02:03 IST

विधानसभेच्या नाशिक शहराच्या चारही जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यातील तिन्ही जागा भाजपने कायम राखून आघाडीचा धुव्वा उडविला, त्याचवेळी गेल्या तीस वर्षांपासून सेनेच्या ताब्यात असलेल्या देवळाली मतदारसंघात मात्र यंदा राष्ट्रवादीने धडक देऊन कब्जा केला आहे. सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नाशिक : विधानसभेच्या नाशिक शहराच्या चारही जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यातील तिन्ही जागा भाजपने कायम राखून आघाडीचा धुव्वा उडविला, त्याचवेळी गेल्या तीस वर्षांपासून सेनेच्या ताब्यात असलेल्या देवळाली मतदारसंघात मात्र यंदा राष्ट्रवादीने धडक देऊन कब्जा केला आहे. सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.नाशिककरांचे शहराच्या चारही मतदारसंघांच्या लढतीकडे सुरुवातीपासूनच लक्ष लागून होते. नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपने अखेरच्या क्षणी विद्यमान आमदार बाळासाहेब सानप याचे तिकीट कापून ते मनसेचे राहुल ढिकले यांना दिल्याने राष्टÑवादीने सानप यांना नामांकनाच्या शेवटच्या क्षणी उमेदवारी देऊन रिंगणात उतरविले होते, तर राष्टÑवादी कॉँग्रेससाठी मनसेचे उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेऊन सानप यांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपविरुद्ध राष्टÑवादी अशी सरळ लढत होऊन त्यात अखेर भाजपने बाजी मारली. नाशिक मध्य मतदारसंघातही तिरंगी लढत झाली. भाजपने विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांची उमेदवारी कायम ठेवली, तर कॉँग्रेसने अगोदर शाहू खैरे व नंतर डॉ. हेमलता पाटील यांना उमेदवारी दिली. मनसेने माजी आमदार नितीन भोसले यांना रिंगणात उतरविले होते. पूर्व मतदारसंघाप्रमाणे मध्य मतदारसंघातही एकास एक लढत देण्यासाठी कॉँग्रेस-मनसेत समझोत्याचा प्रयत्न झाला, परंतु तो निष्फळ ठरला. या मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत भाजपच्या देवयानी फरांदे यांनी मतविभागणीचा फायदा घेत दणदणीत विजय मिळविला.नाशिक पश्चिम मतदारसंघातही नाट्यमय घटना घडल्या. हा मतदारसंघ सेनेला सुटावा यासाठी सेनेने बराच आटापिटा केला. परंतु भाजपने विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे सेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यांच्या समर्थनार्थ सेनेच्या सर्व नगरसेवक व साडेतीनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन सीमा हिरे यांच्यासमोर आव्हान उभे केले. परंतु त्यात दम नसल्याचे मतमोजणीत स्पष्ट झाले. पंचरंगी झालेल्या लढतीत सीमा हिरे यांनी बाजी मारली. या मतदारसंघात राष्टÑवादीने दुसºया क्रमांकाची मते घेतली, तर मनसेचे दिलीप दातीर तिसºया क्रमांकावर, माकपचे डॉ. डी. एल. कराड चौथ्या क्रमांकावर व सेना बंडखोर पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. देवळाली मतदारसंघात चमत्कार झाला. शिवसेनेचे बबन घोलप कुटुंबीयांची गेल्या तीस वर्षांची सत्ता राष्टÑवादीने हिसकावली. या लढतीत राष्टÑवादीच्या सरोज अहिरे यांनी विद्यमान आमदार योगेश घोलप यांचा दणदणीत पराभव केला.पश्चिममध्ये निकाल घोषित करण्यास आक्षेपपश्चिम मतदारसंघाच्या शेवटच्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात आली असता बूथ क्रमांक २४२ मध्ये दोन स्लिपा कमी असल्याचे लक्षात आल्यावर मनसेचे दिलीप दातीर व अपक्ष देवा वाघमारे यांनी हरकत घेतली.निवडणूक यंत्रणेकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नसल्याने सर्व उमेदवारांनी एकत्र येत निकाल जाहीर न करण्याची मागणी केली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटला.पूर्वत दोन वेळा रोखली मतमोजणीमतमोजणीत भाजप व राष्टÑवादी यांच्यात अटीतटीची लढत असताना एका ईव्हीएमचे सील काढले असता त्यातील शासकीय कागदपत्रांवर निवडणूक अधिकाºयाची स्वाक्षरी नसल्याने गणेश उन्हवणे या उमेदवाराने हरकत घेतल्याने वीस मिनिटे मतमोजणी रोखण्यात आली.एका ईव्हीएमच्या बॅटरीची पॉवर संपल्याने मतमोजणी करताना अडथळे निर्माण झाले. त्यावर दुसरी बॅटरी आणून ती जोडण्याचे काम करण्यात आले असता, त्यासाठी जवळपास दीड तास मोजणीचा खोळंबा झाला.वाढत्या मताधिक्क्याने अहिरे अस्वस्थदेवळाली मतदारसंघात घोलप कुटुंबीयांच्या विरोधात लढत देणाºया राष्टÑवादीच्या सरोज अहिरे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. तिसºया फेरीअखेर त्यांना दहा हजारांचे मताधिक्क्य मिळताच, हर्षवायूने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मतमोजणी केंद्रातून त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारानंतर तासाभरात त्या पुन्हा परतल्या.घोलप पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असल्याचे पाहून देवळालीच्या मतमोजणी केंद्राकडे सेनेचे नगरसेवक व पदाधिकारी अखेरपर्यंत फिरकले नाहीत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना