भाजप ओबीसी मोर्चाचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:43 IST2020-11-27T00:40:18+5:302020-11-27T00:43:28+5:30
वाढीव वीजबिल, रेल्वे गेट, अतिक्रमणे हटवू नयेत, नगर परिषदेतील भ्रष्टाचाराची चौकशी, अशा विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नाशिकचे संजय सानप व त्यांचे कार्यकर्त्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तहसीलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

भाजप ओबीसी मोर्चाचे उपोषण मागे
नांदगाव : वाढीव वीजबिल, रेल्वे गेट, अतिक्रमणे हटवू नयेत, नगर परिषदेतील भ्रष्टाचाराची चौकशी, अशा विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नाशिकचे संजय सानप व त्यांचे कार्यकर्त्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तहसीलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
उपोषणार्थींनी केलेल्या मागण्या शासकीय स्तरावरील असून, योग्य कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या पत्राची प्रत उपोषणकर्त्यांना देण्यात आली.