आडगाव विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 17:56 IST2020-09-22T17:55:49+5:302020-09-22T17:56:34+5:30
आडगाव : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती मंगळवारी (दि.२२) आडगाव विद्यालयात छोट्या स्वरूपात साजरी करण्यात आली. कार्यक्र म प्रसंगी रयत शिक्षण संस्था, साताराचे सदस्य भाई माळोदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन संपन्न झाले.

प्रतिमा पूजन करतांना भाई माळोदे, समवेत मुरलीधर हिंडे, सुकदेव लभडे, पंढरीनाथ लहारे आदी.
आडगाव : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती मंगळवारी (दि.२२) आडगाव विद्यालयात छोट्या स्वरूपात साजरी करण्यात आली. कार्यक्र म प्रसंगी रयत शिक्षण संस्था, साताराचे सदस्य भाई माळोदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन संपन्न झाले.
रयतेच्या तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविणारे आणि खेड्या-पाड्यातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण उपलब्ध करून देणारे ज्ञानाचे भगीरथ म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून कर्मवीरांविषयी अनेक महान व्यक्तींनी काढलेले गौरवोद्गार याचा स्लाईड शो, कर्मवीरांच्या ओरिजनल आवाजाचा दुर्मिळ व्हिडीओ, रयत काल, आज आणि उद्या यावर माहितीपट जयंतीचे औचित्य साधून आॅनलाईन पध्दतीने विद्यालयाने उपलब्ध करून दिले. तसेच संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार व संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी दुपारी झूम मिटींगद्वारे सर्वांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुरलीधर हिंडे, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.