शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
4
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
5
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
6
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
7
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
8
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
9
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
10
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
11
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
12
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
14
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
15
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
16
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
17
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
18
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
19
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
20
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी-प्राणिप्रेमीही मनपाच्या रडारवर

By admin | Updated: November 12, 2016 22:03 IST

डेंग्यूचा डंख : दहा दिवसांत २९ रुग्णांना लागण

 नाशिक : शहरात थंडीचे प्रमाण वाढले तरी अजूनही विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूची लागण झालेले रुग्ण उपचारासाठी दाखल होत असून, गेल्या दहा दिवसांत १०९ संशयितांपैकी २९ रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली आहे. दरम्यान, महापालिकेने आता पक्षी-प्राणिप्रेमींकडून साठविल्या जाणाऱ्या पाण्याकडे लक्ष केंद्रित केले असून, नवीन बांधकामांच्या ठिकाणीही तपासणी सुरू केली आहे.महापालिका हद्दीत डेंग्यूच्या आजाराने अजूनही नाशिककरांची पाठ सोडलेली नाही. सप्टेंबर महिन्यात ६४० संशयितांचे रक्तजल नमुने तपासण्यात आले असता १७५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते तर आॅक्टोबर महिन्यात ३९८ रक्तजल नमुने तपासण्यात आले असता १३५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले होते. गेल्या दहा दिवसांत १०९ रक्तजलनमुने तपासण्यात आले आहेत.त्यापैकी २९ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. शहरात गेल्या काही दिवसात थंडीच्या प्रमाणात वाढ होऊनही डेंग्यूचा प्रभाव कायम आहे. पावसाळा संपून दीड महिना उलटल्याने आता घरांघरांमध्येच साठविलेल्या पाण्यात डेंग्यूच्या एडीस जातीच्या डासांच्या अळ्या सापडत आहेत. त्यात विशेषत: पक्षी-प्राणिप्रेमी हे पक्षी आणि प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी भांड्यात ठेवतात परंतु ते पाणी बदलत नसल्याने त्यात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. प्रामुख्याने, सातपूर भागात असा प्रकार मोठ्या प्रमाणात निदर्शनास आल्याने मनपाने आता पक्षी-प्राणी प्रेमींवरही लक्ष केंद्रीत केले असून त्यांना समज दिली जात आहे.