शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

मानोरी येथे पक्ष्याच्या दाण्या-पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 9:07 PM

मानोरी : यंदा कोरोना विषाणू प्रकोपाने लॉकडाउनमुळे चिमण्यांसह पक्ष्यांना दाणा-पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मानोरी बुद्रुक येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडिअम गुरुकुलात शिकणाऱ्या सायली वावधाने या चिमुकल्या विद्यार्थिनीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची सोय केली आहे.

मानोरी : यंदा कोरोना विषाणू प्रकोपाने लॉकडाउनमुळे चिमण्यांसह पक्ष्यांना दाणा-पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मानोरी बुद्रुक येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडिअम गुरुकुलात शिकणाऱ्या सायली वावधाने या चिमुकल्या विद्यार्थिनीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची सोय केली आहे.पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची सोय करण्याचे सायली वावधानेचे हे चौथे वर्ष आहे. वातावरणात अचानक बदल होत असून, ढगाळ वातावरणामुळे मागील पंधरा दिवसांपासून उष्णतेचा पारा चाळिशी पार गेला. विविध पक्ष्यांचा किलबिलाट मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. मानोरीत काही दिवसांपूर्वी सार्वजनिक पाणवठे, पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ साचलेले पाणी, डबके अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिमणी, कावळे, साळुंकी, करकोचे असे विविध प्रकारचे पक्षी पाणी पिताना दिसून येत होते. एकीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई अचानक उष्णता वाढल्याने या पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करून आपली तहान भागविणेसुद्धा दुरापास्त झाले आहे. अशातच येथील सायली वावधाने हिने आपल्या घरासमोरील वृक्षांनाच बाटल्या कापून तसेच नरसाळे आदींना झाडांच्या मध्यभागी बांधून या चिमण्या, कावळे, साळुंक्या आदी पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची सोय केली आहे. यामुळे भर उन्हात होणारी पक्ष्यांची भटकंती थांबली आहे. दिवसभरात या वृक्षावर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे पक्षी, चिमण्या आपली तहान आणि भूक भागविण्यासाठी येतअसतात.

टॅग्स :Nashikनाशिक